नगररचनाकारांनी नगरपंचायतीकडे केला सुपूर्त
गुहागर, ता. 21 : शहरामधील विद्यमान जमीन वापर नकाशा तयार झाला आहे. (Existing land use map of Guhagar ready) हा नकाशा आज रत्नागिरीची नगर रचनाकार श्रीकांत प्रभुणे यांनी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे सुपूर्त केला. पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये सदर नकाशाचा अभ्यास करुन त्रुटी दाखवून देण्याचे काम गुहागर नगरपंचायतीने करावे. अशी विनंती प्रभुणे यांनी केली आहे.


गुहागर शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी आजच्या स्थितीला गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोणत्या ठिकाणी कोणती बांधकामे आहेत. मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते, पायवाटा, पाखाड्या कुठे आहेत. गावठाणे कुठे आहेत. शेती बागायती खालील जमीन कोणती. पडीक जमीन कोणती. शासकीय जागा किती, त्यांचा वापर कसा होत आहे. अशा प्रकारे शहरातील प्रत्येक जमीनचा सर्व्हे ड्रोनद्वारे, भुमि अभिलेख मधील नकाशांचा वापर करुन, नगरपंचायत, अन्य शासकीय यंत्रणांकडून माहिती घेवून करण्यात आला. त्यानंतर नगर रचना कार्यालयाने जमा झालेल्या माहितीच्या आधारे विद्यमान जमीनचा वापर नकाशा तयार केला. Existing land use map of Guhagar ready


हा Existing land use map of Guhagar ready नकाशा शुक्रवारी (ता. 21) नगर रचनाकार श्रीकांत प्रभुणे यांनी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी प्रभुणे म्हणाले की, गुहागरमध्ये दाट वस्तीचे भाग छोटे आहेत. तरीही संपूर्ण शहरातील जमीनींचा सर्व्हे करताना काही गोष्टी नजरचुकीने राहु शकतात. एखाद्या घराला व्यावसायिक मालमत्तेचा कोड दिला जाऊ शकतो. चुकीच्या ठिकाणी इमारत दाखविली गेली. रस्ता दाखवायचा राहीला. अशा त्रुटी राहु शकतात. त्यामुळे नगरपंचायतीने सदर नकाशाचे बारकाईने अवलोकन करुन 15 दिवसांमध्ये त्रुटी दाखवून द्याव्यात. त्यामध्ये बदल करता येतील. त्यानंतर विकास आराखड्याचे कामाला सुरवात होईल.


यावेळी उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता साटले, बांधकाम सभापती सौ. वैशाली मालप, शिक्षण सभापती सौ. सुजाता बागकर, भाजपचे गटनेते उमेश भोसले, माजी उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे, सौ. स्नेहल रेवाळे, सौ. मृणाल गोयथळे, सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, अमोल गोयथळे, अरुण रहाटे, गजानन वेल्हाळ, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद ढवले, सहाय्यक नगररचनाकार सुनील खांडेकर, रचना सहाय्यक अजय यादव, सहाय्यक आरेखक कमलाकर कदम, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, रचना सहाय्यक समाधान जगदाळे आदी उपस्थित होते.Existing land use map of Guhagar ready