गुहागर भाजपची मागणी; पोलीस निरीक्षकांना निवेदन
गुहागर : भारत देशाला सर्वांगीण विकासाच्या(Holistic development) दृष्टीने सक्षम बनवत सर्वांना सोबत घेऊन यशस्वी वाटचाल करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान करणाऱ्या नाना पटोले(Nana Patole) यांच्यावर फौजदारी गुन्हा(Criminal offense) नोंदवून त्यांना तात्काळ अटक (Arrested ) करण्यात यावे, या मागणीचे निवेदन(Statement) गुहागर तालुका भाजपच्यावतीने(BJP) पोलिस निरीक्षक (Inspector of Police) बी. के. जाधव यांना देण्यात आले.
काँग्रेसचे(Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसापूर्वी भंडारा जिल्ह्यातील एका राजकीय कार्यक्रमप्रसंगी “मी मोदींना मारू शकतो, मी मोदींना शिव्या देऊ शकतो” असे बेताल वक्तव्य करून भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमानच केला नाही तर एक प्रकारे प्रधानमंत्र्यांच्या जीविताला धोका पोहचवीणारी धमकीच(Threat) दिली आहे. या त्यांच्या वक्तव्यावरून प्रधानमंत्री मोदी यांच्याबद्दलची त्यांची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने या निवेदनाच्या मार्फत अशी मागणी करत आहोत की देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या प्रधानमंत्र्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरुद्ध त्वरित फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
भाजप(BJP) सोडुन काँग्रेसवासी झाल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत(Lok Sabha Election) नितीन गडकरी पराभव झाला तर घेण्याची घोषणा करणारे नाना पटोले विधानसभेच्या अध्यक्षपदावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर आणल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. आपले राजकीय भविष्य अंधारमय दिसत असल्यामुळे मोदीबाबत बेताल वक्तव्य करुन पक्षश्रेष्ठीना खुष करण्याचा व प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पटोलेंचा बालीश प्रयत्न असल्याचे भाजप गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यानी म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, आरे गावचे सरपंच श्रीकांत महाजन, चिटणीस साईनाथ कळझुनकर, नगरपंचायत विरोधी पक्षनेते उमेश भोसले, शहराध्यक्ष संगम मोरे, नगरसेविका भाग्यलक्ष्मी कानडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष अमोल गोखले, गणेश भिडे, अर्चना खरे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.