रत्नागिरी- भारतीय स्वातंत्र्याचा (Indian independence) अमृतमहोत्सव आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या 45 व्या वर्धापन दिनाच औचित्य साधत #एआयआर नेक्स्ट(#AIR Next) अंतर्गत आज वक्तृव स्पर्धेचं(Rhetoric contest) आयोजन करण्यात आलं होतं. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या(Gogte Joglekar College) राधाबाई शेट्ये सभागृहात(Radhabai Shete Hall) झालेल्या या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एकूण 15 युवा स्पर्धक सहभागी झाले होते.
यातील संजना सूर्यकांत कानगल आणि हर्षाली अभिजित केळकर या दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी आत्मनिर्भर भारत – माझी संकल्पना(Self-reliant India – my concept) , स्त्री – आजची उद्याची, माझं रोल मॉडेल(Woman – Today’s Tomorrow, my role model) या 3 विषयांवर युवक स्पर्धकांनी आपली मत हिरीरीने व्यक्त केली. स्पर्धेसाठी परीक्षक(Examiner) म्हणून श्री. अनिल दांडेकर आणि सौ. ज्योती मुळ्ये यांनी काम पाहिलं.
हॅशटॅग ए आय आर नेक्स्ट या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्व आकाशवाणी केंद्रांच्या(Radio station) माध्यमातून युवकांची मत जाणून घेणारी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी 22 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारीत होईल. हॅशटॅग ए आय आर नेक्स्ट या स्पर्धेतील या निवडक 2 स्पर्धकांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. तसच उर्वरित सर्व स्पर्धकांनाही वेळोवेळी आकाशवाणीच्या कार्यक्रमात संधी दिली जाणार आहे.
यावेळी आकाशवाणी रत्नागिरीचे केंद्रप्रमुख श्री. श्रीनिवास जरंडीकर, अभियांत्रिकी विभाग प्रमुख श्री. चंद्रशेखर मडीवालर, कार्यक्रमाधिकारी समन्वयक श्री. नंदादीपक बट्टा उपस्थित होते. या स्पर्धेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रा. जयंत अभ्यंकर यांचं सहकार्य लाभलं. मीरा खालगावकर, प्रतिमा खानोलकर आणि स्वरदा महाबळ यांनी कार्यक्रमाची सूत्र सांभाळली.