भारतीय मानक ब्यूरोची कारवाई
मुंबई : भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने, शनिवारी (15 जानेवारी 2022) मुंबईतील गोरेगाव भागातल्या ओबेरॉय मॉलमधल्या मेसर्स हैमलेज (मेसर्स रिलायन्स ब्रॅंडस लिमिटेड) या दुकानावर छापे टाकला. या दुकानात, इलेक्ट्रिक आणि बिगर-इलेक्ट्रिक खेळण्यांची प्रमाणित चिन्हाविना (BIS Standard Mark) विक्री सुरु होती. हे केंद्र सरकारने खेळण्यांच्या दर्जाबाबत जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अनेक अप्रमाणित खेळणी देखील जप्त करण्यात आली. Raid on toy shops in Mumbai
मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गेल्यावर्षी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, 1 जानेवारी 2021 नंतर भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे सुरक्षिततेविषयक प्रमाणपत्र आणि मुद्रा म्हणजेच मार्क (BIS Standard Mark) असणे अनिवार्य आहे. Raid on toy shops in Mumbai
केंद्र सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्यास, बीआयएस कायदा 2016 कायद्यानुसार, तो दंडनीय अपराध असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा किमान 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. त्यामुळे खेळणी उत्पादक, वितरक आणि व्यापारी यांनी, बीआयएसने प्रमाणित न केलेली खेळणी बनवू अथवा विकू नयेत. ग्राहकांनीही, प्रमाणित उत्पादक तसेच उत्पादनांची माहिती मिळवण्यासाठी, बीआयएस केअर अॅपचा वापर करावा. असे आवाहन मानक ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. Raid on toy shops in Mumbai
काय आहे BIS Care App
भारतीय मानक ब्युरोने ग्राहकांना बीआयएस मार्क असलेली खेळणी समजावीत यासाठी एक ॲपलिकेशन तयार केले आहे. हे ॲपलिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. पीसी, लॅपटॉप, ॲन्ड्राईड फोन, आय फोन यांच्यासाठी स्वतंत्र ॲप उपलब्ध आहेत. ही ॲप आपण डाऊन लोड करु शकतो. या ॲपलिकेशनमध्ये असलेल्या स्कॅनरवर क्युआर कोड स्कॅन केल्यावर सदर वस्तू बीआयएस मानांकित आहे की याची माहिती आपल्याला समजू शकते.