रिगल कॉलेजच्या शृंगारतळी शाखेतील विद्यार्थी यशस्वी
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी येथे सुरु झालेल्या रिगल कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमातील 7 विद्यार्थ्यांनी आपला अनुभव कालावधी पूर्ण केला. द वुडस् या असगोलीमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये या विद्यार्थ्याचे प्रत्यक्ष शिक्षण सुरु होते. (Regal College Hotel Management Course)
द वुडस्मधील अनुभव प्रशिक्षणामध्ये कु. साहिल गुरव, साहिल पागडे, मंदार करंबळे, रोहन रांजणे, स्वरूप झगडे, ईशा भुवड, स्नेहल पवार हे 7 विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यान्वित असलेल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली. स्वागत कक्षात (फ्रंट ऑफिस) हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे, पर्यटकांचे स्वागत कसे करायचे. त्यांचा रहाण्याचा कालावधी (Check in, Check Out), त्यांची नोंदणी, आर्थिक व्यवहार यामधील संभाषण कसे असावे याचा सराव त्यांनी केला. हॉटेलच्या खोल्यांची स्वच्छता आणि देखभाल करणाऱ्या विभागात (Housekeeping Dept.) प्रशिक्षण घेताना खोल्यांच्या स्वच्छतेबरोबरच अंतर्गत सजावट (टॉवेल आर्ट आदी) या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या. हॉटेलच्या स्वयंपाकघरात (Food Production Dept.) खाद्यपदार्थांची सजावट, वेगवेगळ्या पदार्थांसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करणे, चायनिज, पंजाबी, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ कसे तयार करावेत याचेही प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनी घेतले. फूड आणि बेवरेज डिपार्टमेंटमध्ये गेस्टला सर्विस कशा प्रकारे केली पाहिजे. क्राँकरी, कटलरी, ग्लासेस यांचे वायपिंग, कसे करतात. प्रत्यक्ष फूड सर्विस कशी द्यावी. ग्राहकाचे समाधान कसे करावे. त्यांचा मुड कसा सांभाळावा. आदी गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना मिळाले. वूडस रिसॉर्टचे मालक सौ. परिता महाडिक व शेफ एकनाथ धुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. (Regal College Hotel Management Course)
रिगल कॉलेज, शृंगारतळी मध्ये १००% नोकरीची हमी देणारा हॉटेल मँनेजमेंट डिग्री व डिप्लोमा १ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आला आहे. या कोर्सेसच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ६ महिने हॉटेल प्रशिक्षण व मानधन दिले जाते. नुकतेच विद्यार्थ्यांनी वूडस रिसॉर्ट असगोली येथे १ महिन्याची ट्रेनिंग पूर्ण केली. या ट्रेनिंगबद्दल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. (Regal College Hotel Management Course)
हॉटेल मॅनेजमेंटसह अन्य व्यावसायिक अभ्याक्रमांमध्ये पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी रिगल कॉलेज शृंगारतळी तौहिद मॉल, गुहागर रोड, शृंगारतळी मोबाईल नं.७०६६०३४२०० येथे संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के व प्राचार्या रेश्मा मोरे यांनी केले आहे. (Regal College Hotel Management Course)