• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थ्यांनी अनुभवले ऑनलाईन औद्योगिक क्षेत्र भेट

by Ganesh Dhanawade
January 17, 2022
in Guhagar
16 0
0
विद्यार्थ्यांनी अनुभवले ऑनलाईन औद्योगिक क्षेत्र भेट
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वर महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेटेंशन अभियांत्रिकी विभागाचा उपक्रम

गुहागर : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय(Maharshi Parashuram College of Engineering), वेळणेश्वर मध्ये दि. १६ रोजी एकदिवसीय ऑनलाईन औद्योगिक(Online industrial) भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर औद्योगिक क्षेत्र भेट ‘साखर कारखान्यात(Sugar factory) होणाऱ्या विविध तांत्रिक कार्य प्रणाली'(Operating system) या विषयावर पार पडली. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री(Minister of Water Resources and Benefit Sector) जयंत पाटील यांच्या सांगली येथील साखर कारखानाचा अभ्यास यावेळी उपस्थितांनी केला.
यावेळी साखर कारखान्यात असणाऱ्या विविध विभाग क्रेन कॅरियर, शुगर केन क्रशर, ज्यूस हाऊस,  बॉयलर, पॉवर हाऊस, बॉईलिंग हाऊस, सेंट्रिफ्यूगल सेक्शन, शुगर क्रिस्टलाइजर तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या हाय व्होल्टेज इंडेक्शन मोटरची कार्य प्रणाली, टेंपरेचर डिटेक्टर, कंट्रोल पॅनल त्याचप्रमाणे सध्याच्या आधुनिक साखर कारखान्याच्या औद्योगिक स्वयंचलित उपकरणांमध्ये प्रोग्रॅमिंग(Programming) आणि कमिन्सिंग कसे केले जातात यावर सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांना वरील सर्व विभागांची लाईव्ह वर्किंग(Live working) दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे साखर औद्योगिक क्षेत्रामध्ये करिअरची सुरुवात कशी करावी व त्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी कोणकोणती कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहेत यावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 
या वेबिनारमध्ये महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर, विद्या प्रसारक मंडळ पॉलिटेक्निक(Vidya Prasarak Mandal Polytechnic) , ठाणे या महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेटेंशन(Instrumentation) विभागातील द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी व्हिपीएम तंत्रनिकेतन, ठाणे येथील इन्स्ट्रुमेटेंशन विभागाच्या विभागप्रमुख प्रा. वि.ए. जोशी मॅडम यांची उपस्थिती लाभली. सदर औद्योगिक क्षेत्र भेटीसाठी महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेटेंशन विभागाचे प्रा. केशव ज. चौगुले यांनी तज्ञ व्याख्याते, प्रशिक्षक व समन्वयक म्हणून काम पाहिले. सदर वेबिनार इन्स्ट्रुमेटेंशन अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. केतन कुंडीया व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाला.

Tags: GuhagarGuhagar NewsLive workingMaharshi Parashuram College of EngineeringMarathi NewsMinister of Water Resources and Benefit SectorNews in GuhagarOnline industrialSugar factoryVidya Prasarak Mandal Polytechnicऑनलाईन औद्योगिक क्षेत्रजलसंपदा व लाभक्षेत्र मंत्रीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयलोकल न्युजविद्या प्रसारक मंडळ पॉलिटेक्निक
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.