वरवेलीतील घटना, आईला भेटायला माहेरी आली होती
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी येथे मनाली विजय भागडे (वय ४२), कडाप्पा तुटल्याने शौचालयाच्या टाकीत पडली. त्यावेळी डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (15 जानेवारी) सायंकाळी घडली. सौ. मनाली वरवेलीला आजारी आईला भेटायला आली होती. (Woman dies after falling into toilet tank)
सौ. मनाली (सासर – वहाळ ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) सध्या मुंबईत रहात होती. तिचे माहेर वरवेली आगरे वाडी असून माहेरचे नाव शुभांगी आगरे आहे. तिची आई गंभीर आजारी असून अंथरुणाला खिळली आहे. तिला भेटण्यासाठी सौ. मनाली भागडे दोन दिवसांपूर्वी वरवेलीला आली होती. घराच्या परसावात शौचालयाच्या टाकी शेजारी सौ. मनाली कचरा काढण्याचे काम करत होती. कचरा काढताना त्या नकळत शौचालयाच्या टाकीवर गेल्या त्याचवेळी टाकीवरील कडाप्पा तूटला आणि मनाली तोल जावून शौचालयाच्या टाकीत पडली. (Woman dies after falling into toilet tank)
आगरे यांच्या घराशेजारी मयत झाल्याने अनेक मंडळी येथे जमली होती. शौचालयाच्या टाकीत कोणीतरी पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. मनालीला बाहेर काढले. त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून नाकातून रक्तस्त्राव होत होता. ती बेशुद्ध झाल्याचे लक्षात आले. तातडीने ग्रामस्थांनी तिला डॉक्टरांकडे नेले. मात्र डॉक्टरांनी मनालीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. (Woman dies after falling into toilet tank)
या घटनेची माहिती रविंद्र रामचंद्र आगरे वय ४६, रा. वरवेली यांनी गुहागर पोलीस ठाण्यात याची दिली आहे. अधिक तपास गुहागर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आनंदराव पवार करित आहेत. (Woman dies after falling into toilet tank)