समुद्रकिनाऱ्यावरील प्रतिकुल परिस्थितीचा फटका
गुहागर, ता. 15 : येथील 7.5 लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर महापुरात वाहून आलेला कचरा आणि ऑईलचा थर (Problem of Oil mixed waste on Sea) अजुनही तसाच आहे. परिणामी दोन मादी कासव अंडी न घालता परत गेल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी एका मादी कासवाची नोंद वन विभागाकडे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील ऑइलमिश्रीत कचरा दूर न झाल्यास (Problem of Oil mixed waste on Sea) अशा घटना वारंवार घडतील. अशी चिंता कासवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
गुहागर नगरपंचायतीने सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात जेसीबी लावून हा कचरा दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेसीबी वाळूत रुतत असल्याने या कामासाठी वेळ खर्च होतो. जेसीबीचे भाडे आणि होणारे काम याचा आर्थिक गणित व्यवहार्य होत नाही. त्यामुळे इतक्या लांबीचा समुद्रकिनारा स्वच्छ करणे नगरपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे आहे. (Problem of Oil mixed waste on Sea)
काही पर्यटन व्यावसायिकांनी समुद्रावर उतरण्याच्या रस्त्याच्या आजुबाजुचा कचरा जाळून टाकला आहे. परंतु कचऱ्यातील ऑईल सुकलेले, डांबरासारखे घट्ट आणि चिकट असल्याने हाताला, कपड्यांना चिकटते. त्यामुळे तांत्रिक उपकरणांद्वारे स्वतंत्र आर्थिक व्यवस्थेमधुन गुहागरचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. (Problem of Oil mixed waste on Sea)
संबंधित बातमी : गुहागरमध्ये कासवांची 595 अंडी संरक्षित
या कचऱ्याकडे आर्थिक बाजू डळमळीत असल्याने नगरपंचायत लक्ष देत नाही. महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे कक्षेत हा विषय येत नाही. वन विभागाचे समुद्र किनाऱ्यावर नियंत्रण नाही. बंदर विभागाला समुद्रकिनाऱ्यांवरील समस्येबाबत फारशी चिंता नाही. अशा विचित्र परिस्थितीमुळे समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याची समस्या (Problem of Oil mixed waste on Sea) शासनाच्या कोणत्या विभागाने करायची हा प्रश्र्न आहे. त्याचा फटका मात्र ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या (Olive Ridley Turtle conservation in Guhagar) प्रजननाला बसणार आहे.
आज गुहागर हे कासव संवर्धनाचे जिल्ह्यातील क्रमांक 1 चे केंद्र आहे. तेथे येणाऱ्या मादीला विना अडथळा अंडी घालता आली पाहिजेत. यावर्षी कचऱ्याची समस्या (Problem of Oil mixed waste on Sea) कोकणातील सर्व किनाऱ्यांवर आहे. वेळास येथील समुद्रकिनारा लॉजिस्टीक इन्फ्रा या कंपनीने सीएसआर फंडातून (CSR Fund) स्वच्छ केला. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच कंपनीलाही चांगल्या कामासाठी पैसे खर्च केल्याचे समाधान मिळाले. वन विभाग आणि नगरपंचायतीने याच पध्दतीने काही कंपन्यांशी बोलणी करावी. लवकरात लवकर समुद्रावरील कचरा दूर करावा.
– माधव उपाध्ये, कासवमित्र