ग्रामीण रुग्णालय गुहागर : 6 महिने रखडला होता प्रकल्प
गुहागर, ता. 14 : ग्रामीण रुग्णालयातील काही तांत्रिक कारणांमुळे 6 महिने रखडलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प क्रियान्वित (Oxygen project executed) झाला आहे. हा प्रकल्प 100 लिटर प्रति मिनिट (100LPM) क्षमतेचा आहे. आठवड्यातून एकदा ऑक्सिजन प्रणाली सुरू करुन त्याची देखभाल ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी करत आहेत.
पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प Oxygen project उभारण्यात आला. या प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि एचएलएल इन्फ्राच्या (HLL Infra) वतीने करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट 2021) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आभारी दृकश्राव्य माध्यमांद्वारे (Virtual Media) होणार होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प क्रियान्वित झाला नव्हता. या गोष्टीची दखल घेत सप्टेंबर 2021 मध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ऑक्सिजन प्लांटची पहाणी केली. प्रकल्प क्रियान्वित होण्यामधील अडचणी जाणून घेतल्या होत्या. दरम्यानच्या काळात ऑक्सिजनची मागणी घटल्याने हा प्रकल्प क्रियान्वित करण्याचे काम मागे पडले होते. (Oxygen project executed)
डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागली. त्यामुळे तातडीने सदर प्रकल्प क्रियान्वित (Oxygen project executed) करण्यात आला. नव्या ऑक्सिजन प्लांटमधील ऑक्सिजनचा वापर प्रत्यक्ष रुग्णांसाठी करण्याची गरज अद्याप निर्माण झालेली नाही. तरीदेखील सर्व यंत्रणा कायम उत्तम प्रकारे काम करत आहे याची खात्री ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापन करते. त्यासाठी आठवड्यातून एकदा ऑक्सिजन प्रकल्प सुरु करुन वाहिन्यांद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत येणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण, दाब (100LPM) आदी तांत्रिक गोष्टी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या उपस्थित तपासल्या जातात.