आरोग्यदायी भविष्यासाठी शासनाने टाकलेले पाऊल स्वागतार्ह
गुहागर, ता. 13 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय ताब्यात घेतले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटात गुहागर तालुकावासीयांची ही आग्रही मागणी होती. अखेर ही मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात अत्याधुनिक सेवासुविधांनी युक्त रुग्णालय उभे रहाण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. Covid Center in Niramaya
3 जानेवारी 2022 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी निरायम रुग्णालय अधिग्रहीत करण्याबाबत तहसीलदार गुहागर यांना पत्र पाठवले. त्यानुसार कार्यवाही करत तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी रुग्णालय आणि वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निवासी वसाहतीमधील काही खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील कोविड केअर सेंटर (Covid Center in Niramaya) सुरु करण्याबाबत ग्रामीण रुग्णालय गुहागरला कळविण्यात आले आहे. शासनाकडून इमारत आणि परिसरातील साफसफाई आणि देखभालीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे करत असताना येथील अंतर्गत प्रकाश व्यवस्था, ऑक्सिजनच्या वाहिन्या, जलवाहिन्या उत्तम असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर येत आहे.
दाभोळ वीज प्रकल्प चॅरिटेबल ट्रस्टने सुरु केलेले निरामय हॉस्पिटल (Niramay Hospital) 2000 मध्ये बंद पडले. सदर रुग्णालय पुन्हा सुरु व्हावे यासाठी कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुहागरवासीयांनी सामाजिक माध्यमांवर चळवळ केली. गुहागर मधील पत्रकारांनी निरामय रुग्णालयासंदर्भात विविध बातम्या दिल्या. शासनाकडे या रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी माहितीचे स्त्रोत उपलब्ध करुन दिले. (Covid Center in Niramaya)
29 मे 2021 ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) आणि तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या रुग्णालयाची पहाणी केली. ज्या हेतूसाठी जागा दिली तो हेतू पूर्ण होत नसेल तर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (MIDC) संबंधित जागा ताब्यात घेऊ शकते. या नियमांच्या संदर्भाने ही जागा ताब्यात घेता येईल. अशी चर्चा झाली होती.
आज या संदर्भात शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सदरच्या जागेचा ताबा कोणाकडे आहे याच्या खोलात न शिरता, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करुन सध्या ही जागा शासनाने ताब्यात घेतली आहे. कोविड केअर सेंटर (Covid Center in Niramaya) हा पहिला टप्पा आहे. हे सेंटर यशस्वी झाले तर भविष्यात ग्रामीण रुग्णालय किंवा आरोग्य केंद्र किंवा संपूर्ण परिसर ताब्यात घेवून रुग्णालयाची निर्मिती होऊ शकते.
लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन
Covid Center in Niramaya गुहागर तालुकावासीयांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. शिवतेज फाऊंडेशनने सर्वांना सोबत घेऊन याविषयी जनजागृती केली होती. येथे भविष्यात उत्तम रुग्णालय उभे रहावे. ही तालुकावासीयांची सुप्त इच्छा आहे. शासनाच्या आजच्या निर्णयामुळे या इच्छेला चालना मिळेल. कोट्यवधी रुपये खर्चुन बांधण्यात आलेली वास्तू पुनर्जिवित होईल. त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन.
– ॲड. संकेत साळवी, संस्थापक अध्यक्ष, शिवतेज फाऊंडेशन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या रुग्णालयाची पहाणी केली. त्यावेळचा व्हिडिओ पहा.