दिल्ली : गोवा(Goa), पंजाब(Punjab), मणिपूर(Manipur), उत्तराखंड(Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) या पाच राज्यांतील विधानसभा(Assembly) निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने(Central Election Commission) आज शनिवारी केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने(Election Commission) जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) सात टप्प्यांत १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान मतदान(Voting) होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी आणि मणिपूरमध्ये २७ फेबुवारी आणि ३ मार्च रोजी मतदान होईल. पाच राज्यांतील मतमोजणी(Counting of votes) १० मार्चला होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त(Chief Election Commissioner) सुशील चंद्रा यांनी दिली.
उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान(Voting) १० फ्रेबुवारीला होईल. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ फेब्रुवारी रोजी, तिसरा टप्पा २० फेब्रुवारी, चौथा टप्पा २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा ३ मार्च आणि सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी होईल. गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यांत १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. गोव्यात २१ जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना(Notification of election) जारी होईल. उमेदवारी अर्ज(Candidature application) दाखल करण्याची मुदत(Term) २८ जानेवारी पर्यंत असेल. गोव्यात अर्ज माघारीची(Withdrawal of application) तारीख ३१ जानेवारी आहे. तर गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होईल.
कोरोनामुळे(Corona) १५ जानेवारीपर्यंत रोड शो(Road show), पदयात्रा आणि जाहीर सभांना(Public meetings) बंदी असेल. उमेदवारांनी(Candidate) सोशल मीडियावरुन(Social media) जास्तीत जास्त प्रचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. घरोघरी प्रचारासाठी(Publicity) केवळ पाचजणांना परवानगी(Permission) असेल, असेही त्यांनी सांगितले. पाच राज्यांतील एकूण ६९० मतदारसंघात(Constituency) मतदान होणार आहे. गोव्यात ४० मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. एकूण १८.३४ कोटी मतदार(Voters) या निवडणूक(election) प्रक्रियेत सहभागी घेतील. यात ८.५५ कोटी महिलांचा समावेश आहे.
कोरोनामुळे मतदान केंद्रात(Polling station) वाढ करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या(Omycron) धास्तीत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ECI ने केंद्रीय आरोग्य सचिव(Union Health Secretary) आणि गृह सचिव(Home Secretary), तज्ज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव(Experts and Secretary of State for Health) यांच्यासोबत बैठका(Meeting) घेतल्या. त्यांच्याशी सल्लामसलत(Consultation) करुन सध्यस्थिती लक्षात घेतल्यानंतर, ECI ने सुरक्षिततेच्या निकषांसह निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क(Mask) आणि सॅनिटायजरची(Sanitizer) सोय करण्यात येणार आहे. ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक(Senior Citizens), दिव्यांग व्यक्ती आणि कोविड रुग्ण (Covid patient ) पोस्टल मतपत्रिकेद्वारे(Postal ballot) मतदान करू शकणार आहेत, असे ते म्हणाले.
मतदानाची वेळ एक तासाने वाढवली
कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) निवडणूक वेळापत्रकांच्या घोषणेपासून लगेच लागू होते. आचारसंहिता(Code of Conduct) मार्गदर्शक(Guide) तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी(Implementation) सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने(Election Commission) विस्तृत व्यवस्था केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणीही उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका(Assembly elections) तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने(Central Election Commission) नुकताच संबंधित राज्यांतील कोविड(Covid) तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या(Law and order) स्थितीचा आढावा घेतला. सदर राज्यातील प्रशासनांनी लसीकरण मोहिमेला(Vaccination campaign) वेग द्यावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.