कनिष्का बावधनकर, विवेक बाणे, रेईशा चौगुले गुणवत्ता यादीत चमकले
गुहागर : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची(Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir) विधार्थिनी कु. आर्या मंदार गोयथळे हिने शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (Scholarship Exam ) इयत्ता पाचवी मधून शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत(Urban General Quality List) 268 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे(Maharashtra State Examination Council) तर्फे पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती(Upper Primary Scholarship) व आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Eighth Pre-Secondary Scholarship Examination) घेण्यात आली होती. यामध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या(Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir) इयत्ता पाचवीमधील विद्यार्थीनी कु. आर्या मंदार गोयथळे हिने शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून 268 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर इयत्ता आठवी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता मधून कनिष्का समीर बावधनकर हि जिल्ह्यात 37 वी आली आहे. इयत्ता पाचवी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत विवेक राजेंद्र बाणे हा जिल्ह्यात 36 वा आला. इयत्ता पाचवी शहरी सर्वसाधारण मधून रेईशा वीरेन्द्र चौगुले जिल्ह्यात 47 वी आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे .
इयत्ता पाचवी मधून कु. सानवी संकेत गोयथळे 170, अनुष्का पंकज देवकर 176, प्रणव दत्तात्रय मेटकरी 154 गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता आठवी मधून हर्षदा शाम नाटेकर 146, प्रज्ञा संदेश घाणेकर 140 गुण मिळवून यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक मंदिरमध्ये कोरोनाचे(Corona) सर्व नियम पाळून सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे(Guhagar Education Society) अध्यक्ष महेश भोसले, शाळा कमिटी (School committee) अध्यक्ष दीपक कनगुटकर, मुख्याध्यापक(Headmaster) शिवाजी आडेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.