महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान , 35 वर्ष प्रबोधन
गुहागर, ता. 8 : महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भजनी कलावंत व तमाशा कलावंत श्री किशोर भागडे यांचा नुकताच शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. Bhajani artist Kishor Bhagde felicitated
श्री. किशोर भागडे हे गेली 35 वर्ष किर्तन वाडी येथे सुश्राव्य संगीत भजनाच्या माध्यमातून व तमाशा या कलेच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन व प्रबोधन करीत आहेत तमाशामध्ये ते विविध भूमिका साकारत आहेत. ते स्वतः उत्तम भजनीबुवा आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. गुहागर नंबर 1 या शाळेचे ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्याची दखल घेऊन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे गुहागर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. Bhajani artist Kishor Bhagde felicitated
यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष मनोज पाटील, समन्वयक नितीन घरट, पदाधिकारी क्षितिजा मोरे, शाळा व्यवस्थापन समिती गुहागर नंबर एक च्या उपाध्यक्ष अवंती गमरे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन घुमे, मनीषा साटले आदी मान्यवर उपस्थित होते.Bhajani artist Kishor Bhagde felicitated