असीमकुमार सामंता : पत्रकार संघाने श्रेष्ठदानाची संधी दिली (Blood Donation Camp in RGPPL)
गुहागर, ता. 07 : रक्तदानासारख्या सेवा उपक्रमामुळे आरजीपीपीएलचा परिसर पवित्र झाला. त्यासाठी आम्ही गुहागर तालुका पत्रकार संघाचे आभारी आहोत. असे प्रतिपादन आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी केले. ते रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. (Blood Donation Camp in RGPPL)


पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी गुहागर तालुका पत्रकार संघाने आरजीपीपीएलमध्ये रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp in RGPPL) आयोजन केले. या शिबिरात आरजीपीपीएल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, कोकण एलएनजी, निवासी वसाहत सुरक्षा या सहयोगी कंपन्यांमधील 36 अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि आरजीपीपीएलच्या सेवा स्वास्थ्य केंद्राने वैद्यकीय मदत केली. आजच्या रक्तदान शिबिरात 17 रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले.


शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना सामंता म्हणाले की, आरजीपीपीएलसाठी आजचा पुण्यदिवस आहे. पाणी आहे म्हणून पृथ्वीवर जीवन आहे. त्याचप्रमाणे रक्त आहे म्हणून शरीर क्रियान्वयन करते. इतके महत्त्व असलेल्या रक्तदानाने एक व्यक्ती तीन जीव वाचवू शकते. आरजीपीपीएलने अनेक उपक्रम घेतले पण रक्तदानासारखे पुण्यकर्म करण्याची संधी यापूर्वी मिळाली नाही. आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणाऱ्या, सामान्य जनांना अनेक विषयांची ओळख करुन देणाऱ्या पत्रकारांनी ही संधी आरजीपीपीएलला दिली. सेवा करणे ही सोपी गोष्ट नाही. पत्रकार संघ विविध सेवा उपक्रम घेतात याचा अभिमान वाटतो. रक्तदानासारख्या सेवा उपक्रमामुळे आरजीपीपीएलचा परिसर पवित्र बनला आहे. त्यासाठी पत्रकार संघाचे आम्ही आभारी आहोत. यापुढेही आरजीपीपीएल आपल्या क्षमतेनुसार पत्रकार संघाच्या सेवा उपक्रमांना साथ देईल. Blood Donation Camp in RGPPL


या कार्यक्रमाला प्रकल्पाचे कार्य आणि देखभाल व्यवस्थापक हरबनसिंग बावा, मुख्य वित्त अधिकारी अजय शर्मा, मानव संसाधन विभाग प्रमुख जॉन फिलीप, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) सहाय्यक कमांडंट इंदौरिया, सेवा स्वास्थ्य केंद्राचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. युवराज इंजे, वैद्यकिय अधिकारी डॉ. रिशु रंजन, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे (Indian Red Cross Society) जयवल्लभ गंधेरे, स्वप्नाली किनरे, एैश्वर्या भागवत, निखिल जाधव, जयेश सामंत उपस्थित होते. Blood Donation Camp in RGPPL
रक्तदान करण्याची खूप इच्छा होती परंतू आजपर्यंत संधी मिळाली नव्हती. आज गुहागर तालुका पत्रकार संघामुळे ही संधी मिळाली. रक्तदानासारखे पवित्र दान केल्याचा आनंद लुटता आला.
– रोमेंद्र मिश्रा, सिनियर मॅनेजर (O &M), आरजीपीपीएल