गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक(Lifeguards on the beach) गेली पाच महिने पगारविना(Without pay) आहेत. लांबलचक समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा(Tourist safety) सांभाळणाऱ्या दोन जीवरक्षकांच्या (Lifeguard) पगारासाठी नगरपंचायतीकडे(Nagar Panchayat) तरतूद नाही. त्यामुळे गेली पाच महिने पगारविना काम करणाऱ्या जीवरक्षकांनी 30 डिसेंबर पासून किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचे काम बंद केले आहे.
गुहागर किनार्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरतात. भरती – ओटी, समुद्रातील प्रवाह(Sea flow) याची माहिती नसल्यामुळे अनेकदा पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही. पाण्यात निर्माण होणाऱ्या भोवऱ्यात सापडून पर्यटक बुडण्याचे प्रकार(Incidents of drowning) घडतात. हे लक्षात घेऊन गुहागर समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना समुद्रात सुरक्षितपणे आंघोळ करता यावी, यासाठी गुहागर नगरपंचायतीने शासनाकडे पत्रव्यवहार करून 14 व्या वित्त आयोगातून(Finance Commission) समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठी प्रशिक्षित जीवरक्षक(Trained lifeguards) नेमण्यासाठी गुहागर नगरपंचायतीला निधी दिला. यामध्ये 3 लाख 87 हजार रुपये प्रशिक्षणासाठी आणि 19 लाख 57 हजार रुपये साहित्य खरेदी व जीवरक्षक मानधनासाठी अशी तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे 10 तरुणांना प्रशिक्षण देवून त्यात उत्तीर्ण झालेल्या 6 जीवरक्षकांना गुहागर नगरपंचायतीने वर्षभरासाठी नियुक्त केले. परंतु, त्यानंतर नव्या करारासाठी निधी उपलब्ध न झाल्याने गुहागर नगरपंचायतीने केवळ किनाऱ्यावर 2 जीवरक्षकांवर पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. किनाऱ्याची जबाबदारी संभाळतानाच या जीवरक्षकांनी कोरोना काळात नगरपंचयत प्रशासनाला हातभार म्हणून शहरातील घरोघरी जाऊन नागरिकांना मास्क(Masks), गोळ्या वाटप(distribution of pills), पॉझिटिव्ह रुग्ण(positive patients) आढळून आल्यास घरावर पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची नोटीस(Notice) लावण्याचे काम केले. चिपळूण व गुहागर वरचापाट येथे आलेल्या पुरात नागरिकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्याचे कामहि जीवरक्षक प्रदेश तांडेल (Lifeguard Pradesh Tandel) व निहाल तोडणकर(Nihal Todankar) यांनी केले. शिवाय चार वर्षे काम करत असताना आतापर्यंत गुहागर समुद्रात बुडून कोणतीही दुर्घटना( Accident ) घडलेली नाही. डिसेंबर 2020 मध्ये समुद्रात वॉटर स्पोर्टचा(Water sport) आनंद घेत असताना बुडत असलेल्या आठ पर्यटकांना वाचविण्याचे काम प्रदेश तांडेल याने केले.
दरम्यान, आता पर्यटन हंगाम सुरू झाला असून किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून जीवरक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, सद्या कार्यरत असलेल्या जीवरक्षकांना गेले पाच महिने पगार दिलेला नाही. आपला पगार मिळावा यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्याने या जीवरक्षकांनी किनाऱ्यावरील आपले काम बंद केले आहे. त्यामुळे नगरपंचायतीने किनाऱ्यावर आपले कर्मचारी नेमले आहेत. पण हे कर्मचारी पाण्यात पोहोणारे नाहीत, त्यामुळे आता समुद्रात दुर्घटना घडल्यास याला कोण जबाबदार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.