• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिव्यांग लाभार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबीर

by Ganesh Dhanawade
January 4, 2022
in Guhagar
17 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : केंद्र शासनाच्या दिव्यांग लाभार्थी(Divyang beneficiaries) व ज्येष्ठ नागरिकांसाठी(Senior Citizens) कृत्रिम अवयव(Prostheses) व सहाय्यभूत साधनाचे(Assisted tools) मोफत वाटप करण्यासाठी तपासणी शिबिरे(Inspection camp) घेण्याचे रत्नागिरी जि. प.(Z.P) ने निश्चित केले असून दि. ५ व ६ जानेवारी रोजी हे शिबीर (camp) गुहागर तालुक्यासाठी पाटपन्हाळे हायस्कूल(Patpanhale High School) येथे आयोजित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने(Central government) नियुक्त केलेली ‘भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर’(alimco)  ही संस्था या तपासणी शिबिरात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी करणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी त्यासाठी ऑनलाईन नोंदणी(Online registration) करावयाची आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तीचे ४० टक्क्यांवरील वैद्यकीय प्रमाणपत्र(Medical certificate), उत्पन्नाचा दाखला(income certificate), आधारकार्ड(Aadhaar card), मतदान कार्ड(Voting card), पासपोर्ट साईज २ फोटो, वार्षिक उत्पन्न १,८०,००० असल्यास मोफत उपकरण असे विविध दाखले लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.
या योजनेतून लाभार्थ्यांसाठी कॅलिपर्स(Calipers), व्हीलचेअर(Wheelchair), कुबड्या(Crutches), एलबो स्ट्रेचर(Elbow stretcher), क्रेप्रेस, वॉकिंग स्टिक(Creepress, walking stick), सेरेब्रेल(Cerebral), पालशीसाठी सी.पी. चेअर(For palsy C.P. Chair), अंधांसाठी डेलीप्लेयर(DailyPlayer for the Blind), स्मार्टफोन(Smartphone), स्मार्ट कॅम(Smart cam), ब्रेन क्रेम, ब्रेल स्लेट(Braille slate), ब्रेल किट(Braille kit), कर्णबधिरांसाठी श्रवण यंत्र(Hearing aids for the deaf), १८ वर्षाखालील मतिमंदांसाठी एमएस आयइडी किट, कुष्ठरोग बाधितांसाठी एडीएल किट/एडीएल फोन, कृत्रिम अवयवांमध्ये हात व पाय तपासणे यानुसार नोंदणी होणार आहे. तर ६० वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर(Walker), वॉकिंग स्टिक(walking stick), ट्रायपॉड(tripod) इत्यादी आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात येणार आहे.

Tags: alimcoAssisted toolsCampCentral GovernmentDivyang beneficiariesGuhagarGuhagar Newsincome certificateInspection campMarathi NewsMedical certificateNews in GuhagarProsthesesSenior citizensआधारकार्डउत्पन्नाचा दाखलाऑनलाईन नोंदणीकृत्रिम अवयवकेंद्र शासनज्येष्ठ नागरिकटॉप न्युजतपासणी शिबिरताज्या बातम्यादिव्यांगदिव्यांग लाभार्थीभारतीय कृत्रिम अंग निर्माण निगममतदान कार्डमराठी बातम्यालोकल न्युजवैद्यकीय प्रमाणपत्र
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.