गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आफ्रोहच्या विविध आंदोलनात ठसा उमटवलेल्या रत्नागिरी आफ्रोहच्या 23 कर्मचा-यांनी याही आंदोलनात उत्सफूर्तपणे सहभाग घेवून आपला ठसा उमटवला.
Organization for Rights of Human, Maharashtra for various demands of retired employees Afroh’s various movements on the Azad Maidan in Mumbai 23 employees of Ratnagiri Afroh made their mark by spontaneously participating in this agitation.
आझाद मैदानावर केलेल्या 67 दिवसाच्या ऐतिहासिक साखळी उपोषणानंतरही न्याय न मिळाल्याने आफ्रोहने हिवाळी अधिवेशनादरम्यान वेगळे व हटके आंदोलनाची भूमिका घेतली. आफ्रोहच्या वेगवेगळया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना या आंदोलनासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पुणे, सातारा, वाशिम, ठाणे, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह आंदोलनाच्या दुस-या दिवशी अर्धनग्न आंदोलनासाठी रत्नागिरी आफ्रोहची टीम आझाद मैदानावर दाखल झाली होती. व या आंदोलनादरम्यान राज्य कार्यकारीणी सदस्य व प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माधुरी घावट, उपाध्यक्ष उषा पारशे, सचिव माधुरी मेनकार, विलास देशमुख, पंढरीनाथ पुप्पलवार यांनी आपल्या मनोगतातून आफ्रोहच्या मागण्यांची व सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन देण्याची जोरदार मागणी केली. तर गजेंद्र पौनीकर यांनी जात पडताळणी समितीच्या भ्रष्ट व मनमानी कारभारावर ताशेरे ओढले.
आझाद मैदानावरील या आंदोलनात गजेंद्र पौनीकर यांच्यासह सचिव बापुराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, हेमराज सोनकुसरे, सतीश घावट, गजानन उमरेडकर, सुरेखा घावट, राजेश कुंभारे, श्रीकृष्ण भांडे, प्रवीण सनगाळे, सुनंदाव देशमुख, दिलीप कडू, विश्वास फुकट, रामदास फुकट, बळीराम भगत,बंडू चेचरे यांनी भाग घेतला.