• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा परिषदच्या 58 कोटीच्या प्रशासकीय इमारतीला मंजूरी

by Ganesh Dhanawade
December 30, 2021
in Ratnagiri
16 0
0
जिल्हा परिषदच्या 58 कोटीच्या प्रशासकीय इमारतीला मंजूरी
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून आज रत्नागिरी जिल्हय़ातील मिनी विधान भवनचे स्वरूप असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला आज मंजूरी प्राप्त झाली अशी माहीती अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांनी दिली.
या इमारतीसाठी राज्य सरकारकडून अठ्ठावन्न कोटी सत्तावन्न लाख सतरा हजार तीनशे चौदा रुपये मंजूर करून राज्याच्या बजेट मध्ये तरतूद सुध्दा केली. या संदर्भात अध्यक्ष यांनी 26 जून 2021 रोजी जिल्हा परिषद येथे संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेतली. या नंतर अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून 30 जून 2021 रोजी ग्रामविकास मंत्रालयात सादर केला. त्यानंतर काही त्रुटी मार्गी लावून 16 सप्टेंबर 2021 रोजी तांत्रिक मान्यता घेण्याकरिता मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य यांच्या कडे सादर करण्यात आले.
लगेचच 28 व 29 सप्टेंबर 2021 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली. 01 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने परिपूर्ण व त्रुटींच्या पुर्ततेसह प्रस्ताव सादर केला. 29 नोव्हेंबर 201 रोजी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली.

अवघ्या साडेपाच महीन्यात 58 कोटी रुपये जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी आणण्यात रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव व पूर्ण जिल्हा परिषदेला यश प्राप्त झाले. यात विशेष करून अध्यक्ष यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यी उध्दव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन मुख्य सचिवा सीताराम खुंटे, ग्राम विकासंत्री हसन मुश्यीफ, राज्य मंत्री अब्दूल सत्तार, आमदार भास्करराव जाधव, आणि जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले व अभिनंदन केले. या नवीन प्रस्तावित इमारतीमध्ये यापूर्वीच्या इमारतीमध्ये नसलेले सद्यस्थितीत आवश्यक असलेले जनरल बाॅडी मिटींग हाॅल, कॅन्टीन, मेंबर्स रूम, महिला कक्ष, विडीओ काॅन्फ्रेंस रूम, पॅट्री, समिती सभागृह, प्रशिक्षण हाॅल, पार्किंग, भोजन कक्ष, अशा संपूर्ण सोयीसुविधा असलेली बेसमेंट, तळ मजला व 6 मजली सुसज्ज इमारत असणार आहे. ही जिल्हा परिषद इमारत उभारणी साठी मान्यता वा निधी मिळवण्याच यश माझे एकट्याचे नसून संपूर्ण जिल्हा वासियांचे आहे आणि म्हणून मी आज अध्यक्ष या नात्याने सर्व माझ्या जिल्हा वासियांचे या यशा करिता मनापासून अभिनंदन करतो. असे उद्गार अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांनी यावेळी काढले.

Tags: administrativebuildingGuhagarGuhagar NewsMarathi Newsmini Vidhan BhavanNews in GuhagarRatnagiri DistrictZilla Parishadउपमुख्यमंत्री अजितदादा पवारग्रामविकास मंत्रालयजिल्हा परिषदजिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधवजिल्हा परिषद रत्नागिरीटॉप न्युजताज्या बातम्याप्रशासकीय इमारतमराठी बातम्यामिनी विधान भवनमुख्य अभियंता महाराष्ट्र राज्यमुख्यमंत्र्यी उध्दव बाळासाहेब ठाकरेलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.