ग्राहक हा अर्थ व्यवस्थेचा केंद्रबिंदू – चंद्रकांत झगडे
गुहागर : ग्राहकांनी (Customer) जागृत असणे गरजेचे आहे. त्यासोबत पुरवठादारांनी(Supplier) देखील नैतिकदृष्ट्या आपला व्यवसाय पारदर्शकपणे(Transparent) केला पाहिजे. ग्राहकाने आपले शोषण होण्यापासून मुक्त राहून अन्य ग्राहकाना जागृत केले पाहिजे. आपला संघर्ष कुणा व्यक्तिबरोबर नसून अनुचित व्यापारी प्रथा, अनुचीत वृत्ती याविरोधात असल्याचे प्रतिपादन(Statement) गुहागर तहसीलदार (Guhagar Tehsildar) प्रतिभा वराळे यांनी केले. गुहागर तहसील कार्यालय (Guhagar Tehsil Office) व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गुहागर(All India Consumer Panchayat, Guhagar) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या (National Consumer Day) कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सचिव चंद्रकांत झगडे, जिल्हा सदस्य निलेश गोयथळे, तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, सल्लागार संतोष देसाई, विश्वनाथ रहाटे, तालुका कृषी कार्यालयाच्या भक्ती यादव, आशीर्वाद पावसकर, प्रभाकर सुर्वे, व्ही. एम. वासावे, अशोक शिंदे, प्रशांत हिवाळे, मंडळ अधिकारी एस. पी. गवळी, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. मोरे, मंडळ अधिकारी ए. एस. काजरोळकर, तलाठी आर. एन. सोनार, तलाठी पी. व्ही. काजरोळकर, एम. जी. सावर्डेकर, महावितरण कंपनीच्या जयश्री माळकर, विवेक जोगळेकर, मुकुंद ओक, रवींद्र पवार, उमर हुसेन लालू, प्रकाश आग्रे, केशव तांबे, मज्जिद दाऊत केळकर आदींसह अन्य विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार प्रतिभा वराळे पुढे म्हणाल्या की, ग्राहक हा राजा आहे. पण, त्याला आपले हक्क आणि अधिकार काय आहेत याची माहिती नाही. ग्राहकांसाठी केलेल्या कायद्याची जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. ग्राहकालाआपली नेमकी कुठे फसवणूक होते, हेच त्याला माहित नाही. कायदे ग्राहकांच्या बाजूने आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारीसुद्धा आपल्याकडे आहेत. पण त्याच्यापर्यंत ग्राहक पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सोन्याचा बाजार, कपड्याचा बाजार येथे हमखास फसवणूक होत असते. आजकाल सर्रास मोबाईल, इंटरनेट वापरतो. आपल्याला नेमका जो स्पीड दिलेला आहे, तेवढ्याचे चार्जेस लावली जातात. आपण इतके एमबी वापरले. असे सांगून पैसे कट होतात. प्रत्येक कट होणाऱ्या कॉलचे पैसे घेतले जातात. ही इंटरनेट क्षेत्रातील मोठी फसवणूक आहे. याबाबत आपण कधी दार ठोठावतो का, तर नाही. आपण सुजाण ग्राहक नाही. तसेच बँकिंग, विमा कंपन्या यामध्ये देखील फसवणूक होत असते. ग्राहकाने खरेदी करताना घसतलेल्या वस्तूची पावती घेणे आवश्यक आहे. ती पावती कशा पद्धतीची असावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कोकण प्रांत सचिव चंद्रकांत झगडे यांनी ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केन्द्रबिन्दु आहे. त्यामुळे ग्राहकाने नेहमी सजग राहिले पाहिजे. आपल्या सजग रहाण्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे. ग्राहकांसाठी उपयुक्त असलेला ग्राहक संरक्षण कायदा 24 डिसेंबर 1986 ला संसदेत एकमताने मंजूर म्हणून हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. हा कायदा निर्माण होण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केलेल्या भगीरथ प्रयत्नांची माहिती देऊन गेली 47 वर्षे सेवाभावी वृत्तीने हजारो कार्यकर्ते ग्राहक जागृतीसाठी कार्य करत आहेत. देशव्यापी संघटन असलेल्या ग्राहक पंचायतची कार्यपद्धती विशद केली.
ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकांसाठी एक शस्त्र असून त्याचा वापर करायला शिकले पाहिजे. कायद्याने मिळालेले अधिकार समजावून दुसरी बाजू आपली कर्तव्यहि आपण समजून घेतली पाहिजेत. कायद्याने मिळाले विविध अधिकार विविध उदाहरणे देऊन समजावून देऊन चोखंदळपणा, कृती, सामाजिकता, एकाता,विविध भडक फसव्या जहिराती, सेल याबाबत आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
आपली फसवणूक झाल्यास जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आयोगाकडे दावा कसा दाखल करावा. त्याठिकाणी कशी कार्यपद्ध्ती असते, याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच वजन, मापे यामधील फसवणूक त्यासाठी निगडित असलेले विविध कायदे. खरेदी हि एक कला आहे, ती करत असताना पावतीचा आग्रह धरावा. पावती कशी असावी हे सांगून गॅरेंटी, वॉरेन्टी संज्ञा समजावून दिल्या. सेल, भडक जाहिरातीपसुन सावध रहावे. सर्वांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेच्या चळवळीत सामील होऊन ग्राहक जागृतीचे स्वामी विवेकानंदाना अपेक्षित असलेली मानव सेवा हीच ईश्वर सेवा या कार्यात सहभागी होऊन स्वतः व ग्राहकांचे होणारे शोषण यापासून मुक्त राहूया, असे आवाहन श्री. झगडे यांनी केले.

