तालुक्यांमध्ये चुरस, 3 दिवसात 8 संघांमध्ये खेळले जाणार 15 सामने
गुहागर, ता. 27 : एन.टी.पी.सी. (NTPC), रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) आणि कोकण एलएनजी लि.(KLNG) यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी प्रथमच जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंगळवार (ता. 28) ते गुरुवार (ता. 30) असे तीन दिवस रत्नज्योती क्रिडांगण, आरजीपीपीएल निवासी वसाहत येथे होणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील 8 तालुका संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे कोणता जिल्हा अजिंक्यपदाचा मानकरी कोण ठरतो याकडे कबड्डी प्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे. (Kabaddi Competition in RGPPL)
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने एन.टी.पी.सी. (NTPC), रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) आणि कोकण एलएनजी लि.(KLNG) या कंपन्यांनी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे (Kabaddi Competition in RGPPL) आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्र्वर, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांचे संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक तालुक्याने आपल्या तालुक्यातील विविध संघामधुन खेळणाऱ्या सर्वोत्कृष्ट खेळांडूंची निवड तालुका संघात केली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ जिल्हा अजिंक्यपदाचा मान आपल्या तालुक्याला कसे मिळेल यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील.
स्पर्धेची माहिती देताना जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम म्हणाले की, 8 तालुका संघांचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे. दोन गटात साखळी फेरी होईल. त्यातून 4 संघ निवडले जातील. या 4 संघांमध्ये बाद फेरी होईल. त्यामधून जिंकलेल्या 2 संघात अंतिम सामना खेळवला जाईल. (Kabaddi Competition in RGPPL) जिल्हा संघाच्या निवडीसाठी जयगडला जानेवारी महिन्यात स्पर्धा आहे. मात्र त्याआधी होणाऱ्या या स्पर्धेमुळे जिल्हा संघात संभाव्य खेळाडू कोण असतील याकडे जिल्हा असोसिएशनचे लक्ष असेल.
स्पर्धेचे समन्वयक साबरी गिरीश म्हणाले की, कोरोनाच्या नव्या नियमावलीचे पालन करुन आम्ही ही स्पर्धा रत्नज्योती क्रिडांगण, आरजीपीपीएल निवासी संकुल येथे आयोजित केली आहे. स्पर्धेतील सर्व सामने दररोज सायंकाळी 3 ते रात्री 9 या कालावधीत होती. हे सामने मॅटवर होणार आहेत. एन.टी.पी.सी. (NTPC), रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) आणि कोकण एलएनजी लि.(KLNG) तर्फे विजेत्या संघाला 25 हजार रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला 15 हजार आणि चषक व तृतीय क्रमांकाच्या संघाला 10 हजार आणि चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. (Kabaddi Competition in RGPPL) लांबून येणाऱ्या खेळाडूंची निवास आणि भोजनाची व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आली आहे.
(GUHAGAR NEWS)