गुहागर : ग्राहक दिनानिमित्त उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता गुहागर तहसील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Consumer Day tomorrow, December 24 at 12 PM the program has been organized at Guhagar tehsil office.


24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जातो. यावेळी ग्राहकांची कर्तव्ये व हक्क या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांने तक्रार निवारण मंचाकडे अर्ज करण्याची पध्दती याविषयी आवश्यक ती माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध शासकीय, अशासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.