• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत ८ जानेवारीला रंगणार डबलबारी

by Ganesh Dhanawade
December 21, 2021
in Ratnagiri
17 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : माऊली प्रासादिक रत्नागिरी जिल्हा भजन मंडळातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ भजनी कलाकारांचा सन्मान ८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भजनसम्राट बुवा रामदास कासले (मुंबई) व भजनसम्राट आणि मंडळाचे जिल्हाध्यक्ष बुवा नारायण मिरजुळकर (रत्नागिरी) यांची भजनाची डबलबारी, जुगलबंदी रंगणार आहे. यामुळे भजनप्रेमींना बऱ्याच दिवसांनी रागदारी गायन ऐकण्याची संधी लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन नाट्यकलावंत रामचंद्र आंबेरकर करणार आहेत. रत्नागिरी जिल्हा भजन मंडळाने वर्षभरात कोरोना जनजागृती, गीतगायन, समाजप्रबोधन कोकण विभागीय स्पर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदम, पांचाळ, पाटील या भजनमहर्षीच्या तीन पंथातील तीन बुवांचा तिरंगी भजनाचा सामना आदी कार्यक्रम राबवले. मंडळ भजनी कलाकारांना प्रोत्साहन देत आहे.
जिल्हा भजन मंडळाचे अध्यक्ष कोकणरत्न नारायण मिरजुळकर, उपाध्यक्ष सुदेश नागवेकर, खजिनदार विजय मयेकर, सचिव संतोष आरावकर यांच्यासमवेत कार्यकारिणी मेहनत घेत आहे. डबलबारीच्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त भजनप्रेमींनी उपस्थित राहावे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी बुवा विठोबा (बावा) नागवेकर, रोशन ढवण, अनिकेत शिंदे, अभिजीत सडकर, सचिन आढाव, मिलींद आरेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Tags: bajanBhajan SamratBuwa Narayan MirjulkarGuhagarGuhagar NewsMandal District PresidentMarathi NewsMumbaiNews in GuhagarRamdas Kasaleratnagiriकोरोना जनजागृतीगीतगायनजिल्हा भजन मंडळटॉप न्युजडबलबारीताज्या बातम्यानारायण मिरजुळकरभजनमहर्षीभजनसम्राटभजनसम्राट बुवा रामदास कासलेमराठी बातम्यामाऊली प्रासादिक रत्नागिरी जिल्हा भजन मंडळरत्नागिरीरायगडलोकल न्युजसमाजप्रबोधन कोकण विभागीय स्पर्धासिंधुदुर्गस्वा. सावरकर नाट्यगृह
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.