• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनाचे आयोजन

by Ganesh Dhanawade
December 21, 2021
in Guhagar
16 0
0
भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनाचे आयोजन
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची माहिती

गुहागर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने , ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपाचे माजी आमदार डॉ विनय नातू यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचेही डॉ.नातू यांनी म्हटले आहे.
On the occasion of former Prime Minister Atal Bihari Vajpayee’s jayanti, on 25th December, on the occasion of Bharatiya Janata Party’s Good Governance Day, various programs such as lectures giving information about the performance of Modi government in the last 7 years, honoring senior workers, distribution of e-labor cards will be held. Former BJP MLA Dr. Vinay Natu has given this information. Atalji’s statue will be unveiled in Mumbai in the presence of National President Jagat Prakash Nadda,
डॉ.नातू यांनी  म्हटले आहे की, ‘अटलजी ते मोदीजी – सुशासनाचा प्रयास’ या विषयावर विविध क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने होणार आहेत. तसेच वकील , डॉक्टर , चार्टर्ड अकाऊंटंट , प्राध्यापक , उद्योजक अशा मंडळींचे मेळावे आयोजित करून मोदी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय , सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टाकलेली पावले याची माहिती दिली जाणार आहे. गेल्या ७ वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व अन्य समाजघटकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी पत्रके बूथ स्तरापर्यंत वितरीत केली जाणार आहेत.
या खेरीज सर्व बुथवर अटलजींच्या प्रतिमेला अभिवादन  , जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, अटलजींच्या कवितांचे जाहीर वाचन , महाविद्यालय परिसरात अटलजींच्या जीवनावर निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महापालिका , नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समित्यांमध्ये सुशासनाची कल्पना राबविण्यासाठी उपक्रम राबविणाऱ्या भाजपा लोकप्रतिनिधींचा ‘ अटल पुरस्कार ‘ देऊन गौरव केला जाणार आहे. असंघटीत कामगारांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या ई श्रम कार्ड योजनेची माहिती देऊन संबंधितांना ई श्रम कार्ड चे वितरण करणे आदी कार्यक्रमही होणार आहेत, असेही डॉ विनय नातू यांनी नमूद केले आहे.

Tags: Bharatiya Janata Partye-labor cardGood Governance DayGuhagarGuhagar NewsinformationMarathi NewsModi governmentNews in Guhagaroccasionperformanceworkersई श्रम कार्ड वितरणजिल्हा परिषदटॉप न्युजताज्या बातम्यानगरपालिकापंचायत समितीभाजपाभाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षभाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ विनयजी नातूभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यामहापालिकामाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीराष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.