गुहागर : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात आबालोली हायस्कूलची पद्मश्री प्रसन्ना वैद्य, माध्यमिक गटात पाचेरी आगर हायस्कूलची दीक्षा शितप, उच्च माध्यमिक गटात पाटपन्हाळे हायस्कूलची वसुधा भागडे, तर उर्दू गटात हालीम मुजफ्फर घारे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेत तालुक्यातील १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
In the taluka level storytelling competition organized by Guhagar Taluka Headmasters Association, Padmashree Prasanna Vaidya of Abaloli High School, Diksha Shitap of Pacheri Agar High School in the secondary group, Vasudha Bhagde of Patpanhale High School in the higher secondary group and Halim Muzaffar Ghare in Urdu group got the first number. 17 contestants from the taluka had participated in this competition.


मुंढर येथील श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर येथे शुक्रवारी संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पंचायत समितीच्या शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती भागवत, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मंगेश गोरीवले, सचिव श्री. हसबे आदी उपस्थित होते. तर बक्षीस वितरणासाठी चिखली बीटचे विस्ताराधिकारी मुकुंद कासारे, चिखली केंद्राचे केंद्रप्रमुख कैलास शार्दुल उपस्थित होते. या स्पर्धेच्या प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक तळवली हायस्कूलची माही गुरव, तृतीय पाटपन्हाळे हायस्कूलची मृण्मयी जाधव हिने, माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक मुंढर हायस्कूलची भाग्यश्री पवार, तृतीय पाटपन्हाळे हायस्कूलची सिद्धी आग्रे हिने, तर उच्च माध्यमिक गटात तळवली हायस्कूलची दिशा कळंबाटे द्वितीय, तृतीय प्रिती झगडे हिने पटकाविला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ मंजिरी दळवी, दशरथ कदम, उदय दामले, प्रसन्ना वैद्य, पराग कदम, संदिप शिर्के यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंढर विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.