गुहागर : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शनिवार दि.१८ व रविवार दि.१९ डिसेंबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.
At Varchapat On behalf of Shri Dutt Prasadik Mandal, various programs have been organized in Shri Dutt Mandir on the occasion of Shri Dutt Jayanti celebrations on Saturday 18th and Sunday 19th December.
यानिमित्ताने शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. काकड आरती, सकाळी ७.३० वा. सकाळी श्रींची पूजा, सकाळी ९ वा. श्रींची वारी व भजन, सकाळी ९.३० वा. गावातील वारी, दुपारी १२.३० वा. पोथी वाचन व जन्मकाळ, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं.४ वा. सिद्धकला भजन मंडळ गुहागर यांचे भजन, सायं.५.३० वा. पिंपळादेवी महिला भजन मंडळ वरचापाट यांचे भजन, सायं.७ वा. चैतन्य साप्रंदाय भजन मंडळ पालपेणे कुंभारवाडी यांचे भजन, रात्री ९ वा. श्री महाकाली भजन मंडळ गुहागर किर्तनवाडी यांचे भजन, रात्री १० वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ गुहागर वरचापाट यांचे भजन, रात्रौ ११ वा. निमंत्रित भजनाचा कार्यक्रम, रविवार दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, रात्रौ ११ वा. श्रींच्या पालखीची मिरवणूक आदी सर्व कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरे केले जाणार आहेत. तरी या सर्वांनी श्री दत्त दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाट यानी केले आहे.