मुंबई : आता विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे महाराष्ट्र राज्यातील पहिले प्र-कुलपती असणार आहेत.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अधिवेशानात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. ना. उदय सामंत यांना हा मान मिळणार असल्याने रत्नागिरीच्या वैभवात एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे. आता विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा अधिकार एकप्रकारे राज्य सरकारने आपल्याकडे घेतला आहे. मात्र, असं असलं तरी राज्यपालांचे अधिकार अबाधित राहतील असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलाय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.