गुहागर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा गुहागर तालुक्याची सभा माजी तालुकाध्यक्ष गणेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षेत माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी शाखा शृंगारतळी या ठिकाणी नुकतीच संपन्न झाली. सदर सभेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गुहागर तालुक्याची नवीन कार्यकारणी दोन वर्षे कालावधीसाठी जाहीर करण्यात आली. सदर संघटनेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक श्री. सुमंत यशवंत भिडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
The meeting of Maharashtra State Teachers Council Branch Guhagar Taluka was recently held under the chairmanship of former Taluka President Ganesh Kulkarni at Secondary Teacher-Non-Teaching Staff Credit Bureau Branch Sringartali. The teacher of Patpanhale High School, Shri. Sumant Yashwant Bhide was elected unopposed.


या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी संदिप शिर्के – मुंढर हायस्कूल , श्री गणपती जबडे – तळवली हायस्कूल, सचिवपदी शावरी शरणाप्पा बंदिछोडे – अंजनवेल हायस्कूल, सहसचिव – कृपाल परचुरे – गुहागर हायस्कूल, खजिनदार – सुरेश आंबेकर – पाटपन्हाळे हायस्कूल, महिला आघाडी प्रमुख सौ.राधा शिंदे – गुहागर हायस्कूल, संघटन मंत्री – श्रीनाथ कुळे – तळवली हायस्कूल तर कार्यकारिणी सदस्य म्हणून नरेंद्र रहाटे – आबलोली हायस्कूल, विलास कोरके – गुहागर हायस्कूल, संजीव मोरे – पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालय, किरण शिवणकर पाटपन्हाळे हायस्कूल, आबासाहेब कदम – हेदवी हायस्कूल, संदीप रामाणे – शीर हायस्कूल, नवरंग पाटील – गुहागर हायस्कूल, अभय जोशी – वाघांबे हायस्कूल , सौ. मनीषा सावंत – गुहागर हायस्कूल, सौ.मनाली बावधनकर – गुहागर कनिष्ठ महाविद्यालय, सौ.सायली गडदे – वाघांबे हायस्कूल, श्री.वैभव ढोणे – गुहागर हायस्कूल यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गुहागरचे माजी तालुकाध्यक्ष गणेश कुलकर्णी, मार्गदर्शक व सल्लागार श्री. मंगेश गोरीवले , शिवाजी आडेकर, श्री.शंकर हिरवे , माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक महेंद्र साळगावकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गुहागरचे माजी सचिव विनायक जाधव आदींनी अभिनंदन करून संघटनेच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नवनिर्वाचित गुहागर तालुकाध्यक्ष श्री.सुमंत भिडे यांनी आगामी काळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना तालुक्यात वाढविण्यासाठी तसेच संघटनेतर्फे उपक्रम व कार्यक्रम राबवण्यासाठी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.