गुहागर : कालभैरव क्रिडा मंडळ झोंबडी आयोजित भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत तेज इलेव्हन रत्नागिरी संघाने विजेतेपद, फाईज मि-या संघाने उपविजेतेपद पटकावले. तर तृतीय क्रमांक wcc वाघिवरे, चतुर्थ क्रमांक जय साई स्पोर्ट्स त्रिशूल साखरी संघाला मिळाला.
Kalbhairav Sports Board organized Zombadi Bharatiya Janata Party Guhagar Taluka Awarded In the Tennis Ball Over Arm Cricket Tournament, Tej Eleven Ratnagiri won the title and Faiz Mirya won the runner-up spot. The third place went to WCC Waghivare and the fourth place went to Jai Sai Sports Trishul Sakhari.


या स्पर्धेचे उद्घाटन ओबीसी सेल उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या हस्ते करण्यात आले. गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील संतोष लक्ष्मण जैतापकर क्रिडानगरीत ७ दिवस पार पडलेल्या या स्पर्धेत ५३ संघांनी सहभाग घेतला होता. एक ग्रामपंचायत मर्यादित ३८तर खुल्या गटातील १५ संघ यामध्ये सहभागी झाले होते. विजेत्या संघाला रोख रूपये ५१ हजार, उपविजेत्या संघास रोख रूपये २५ हजार, तृतीय क्रमांकास रोख रूपये १५ हजार तर चतुर्थ क्रमांकास ५ हजार व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मालिकावीर मि-या संघाचा अवधूत तांडेल, अंतिम सामना सामनावीर अमोल भोसले, फलंदाज मोसीम चौगुले, गोलंदाज विजय शिवलकर यांना चषक व टि शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी कालभैरव स्पोर्ट्सचे आशिष सकपाळ यांनी टि शर्ट दिले होते. स्पर्धेत पंच म्हणून कैलास पिलणकर,बंधू मोहिते, अन्वर बोट तर समालोचन बाळू बागकर, आसीम साल्हे, आतीफ फतीर, प्रशांत आदवडे, अब्बास केळकर यांनी केले.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ विनयजी नातू, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, भाजपा ओबीसी सेलचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, जिल्हा चिटणीस मंगेश जोशी, तालुका सरचिटणीस सचिन ओक, विजय भुवड, चिटणीस अनिल खडपेकर, साई कळझुणकर, ओबीसी आघाडी गुहागर तालुका संयोजक दिनेश बागकर, चिपळूण तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, संतोष भडवलकर, मारूती होडे, आरेगाव सरपंच श्रीकांत महाजन, आंबेरे सरपंच रविंद्र अवेरे, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष संदिप साळवी, इक्बाल पंछी, विजय मसुरकर, सोशल मिडिया जिल्हा संयोजक शार्दुल भावे, प्रकाश मोरे, शक्तिकेंद्र प्रमुख सुनिल भेकरे, सुदर्शन पाटील, गुहागर शहराध्यक्ष संगम मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, माजी सैनिक मनोहर लांजेकर, लतिफ लालू, मनोज डाफळे, समीर वेल्हाळ, युवा मोर्चाचे जगन्नाथ भोसले, सुयोग विचारे, समीर गावणंग, कालभैरव स्पोर्ट्स चिपळूणचे आशिष सकपाळ, गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर तावडे, रहिम लालू, आशिष ठाकूर,नासीम साल्हे, प्रमोद जाधव, विनोद जाधव आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, क्रिडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी कालभैरव क्रिडा मंडळ झोंबडी समीर तावडे, निखिल तावडे, अभिजित सकपाळ, अवधूत सकपाळ आदींसह सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. सदर स्पर्धा प्रथमेश निमुणकर यांच्या नवलाई इव्हेंट द्वारे यू ट्यूब वर लाईव्ह दाखविण्यात आली. स्पर्धेत मुंबई,रायगड येथील खेळाडूंनी सहभागी घेतला होता.

