गुहागर : वेगाने जाणाऱ्या महेंद्रा सुप्रो गाडीने दुचाकीस्वाराला धडक देऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ डिसेंबर रोजी कुडली ते तरीबंदर दरम्यान घडला होता.
A speeding Mahindra Supro hit a two-wheeler in an accident a seriously injured cyclist has died during treatment.The accident took place on December 7 between Kudli and Taribandar.


अधिक माहिती अशी की, महेंद्रा सुप्रो एम.एच.०८ एपी २२१३ क्रमांकाचे गाडी चालक जितेश काजरोळकर हे कुडली बंदरवाडी ते बौद्धवाडी अशीवेगाने गाडी चालवित असताना याचवेळी कुडली टाकेवाडी ते कुठली तरीबंदर अशी जाणारी हिरो एचएफ डीलक्स गाडी क्र. एम.एच,०८ एटी ३१९३ या दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील अरुण चंद्रकांत सुर्वे (कुडली टाकेवाडि, वय 29) व मानसी मंगेश सुर्वे हे दोघे जखमी झाले. अरुण सुर्वे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद हेड कॉन्स्टेबल स्वप्निल शिवलकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. अपघातास कारणीभूत असलेल्या जितेश काजरोलकर याच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायदा कलम अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पो. सहा. निरीक्षक बी. के. जाधव करीत आहेत.