• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राहक चळवळ समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक – स्नेहा जोशी

by Ganesh Dhanawade
December 13, 2021
in Guhagar
17 0
0
ग्राहक चळवळ समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक – स्नेहा जोशी
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : आजच्या स्पर्धेच्या व जाहिरातीच्या युगात ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असलेली पाहावयास मिळते. आपण सर्वच ग्राहक आहोत, ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ सर्व समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सौ. स्नेहा जोशी यांनी केले.
In today’s age of competition and advertising, consumer fraud is rampant. We are all consumers, asserting that the consumer movement must reach out to all communities to protect consumer interests National Executive Member of All India Consumer Panchayat Performed by Mrs.Sneha Joshi.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या गुहागर तालुक्याची कार्यकारिणी सभा नुकतीच गुहागर भंडारी भवन सभागृहात पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जोशी पुढे म्हणाले की, अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करते. ग्राहकाला समोर ठेवून बाजारपेठ सजवल्या जातात. मात्र, काही वेळा ग्राहकांची फसवणूक होत असते. अशावेळी ग्राहकाने जागरूकता दाखवून सनदशीर मार्गाने स्वतःला न्याय मिळण्यासाठी ग्राहक पंचायतीकडे संपर्क साधावा. 2024 मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला 50 वर्षे पूर्ण होतील. ग्राहक पंचायतचे भारत सरकारची अधिकृत संघटना आहे. त्याची ताकद व व्याप्तीही मोठी आहे. मात्र ग्राहकाने आपल्यावर अन्याय झाल्यास जागृकतेने तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्याकरता ग्राहक पंचायतीच्या वतीने 15 ते 31 डिसेंबर हा ग्राहक पंधरवडा संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी सर्व ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जोशी यांनी केले.
या सभेला ग्राहक पंचायतीचे प्रांत सचिव चंद्रकांत झगडे, तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, जिल्हा सदस्य निलेश गोयथळे, मनोज बावधनकर, संतोष देसाई, सुशीला अवेरे, अभिजीत मयेकर, प्रवीण कणगुटकर, ईश्वरचंद्र हलगरे, संदीप चव्हाण, प्रतीक्षा पाडावे, सोनाली वरंडे, मंदार गोयथळे, समीर पवार, आशीर्वाद पावसकर, सुरेंद्र मर्दा आदींसह अन्य ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

Tags: advertisingAll India Consumer PanchayatcommunitiesconsumersGuhagarGuhagar Newsinterests National Executive MemberMarathi NewsNews in Guhagarअखिल भारतीय ग्राहक पंचायतग्राहकग्राहक चळवळग्राहक पंचायतजाहिरातटॉप न्युजताज्या बातम्याभंडारी भवन सभागृहभारत सरकारमराठी बातम्याराष्ट्रीय कार्यकारणीलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.