गुहागर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने सेवा सप्ताह सुरू असुन त्यानिमित्ताने गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पालशेत येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
पालशेत बाजारपेठेतील गुहागरकर कॉम्प्लेक्समधे संपन्न झालेल्या या शिबीरात शासकीय नेत्र चिकीत्सा अधिकारी डॉ.दिनेश जोशी यांनी नेत्र तपासणी केली. या शिबीराची सुरूवात पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत,तालुका सरचिटणीस सचिन ओक, चिटणीस साईनाथ कळझुणकर, उपाध्यक्ष नाना पालकर, मंगेश रांगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय मालप, महेश तोडणकर,मोहन पाटील, निलेश दाते,प्रविण दाते, विनायक गुहागरकर, राहूल सैतवडेकर,अमर जोशी उपस्थित होते.शिबीरात डॉ.दिनेश जोशी यांनी 75 रूग्णांची तपासणी केली. तपासणीमध्ये निदान झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व चष्मा वाटप भाजपाकडून करण्यात येणार आहे.