नरवणचा बगाडा : भाविकांबरोबर पर्यटकांची गर्दी
गुहागर : तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव शनिवारी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामदेवतेचा बगाडा पहाण्यासाठी तालुकावासीयांबरोबरच पर्यटकही उपस्थित होते. मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. देवस्थान कमिटीने कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा केला. The Bagada festival of Shri Vyaghrambari Devi, the village deity of Narvan village in the taluka, was celebrated with great enthusiasm in the temple premises on Saturday. Tourists were present along with the people of the taluka to see the ruin of the village deity. The temple premises had the appearance of a fair. The temple committee celebrated the festival following all the rules of the corona. (Bagada festival of Shri Vyaghrambari Devi)
कार्तिक महिन्याच्या दर्श अमावस्येला देवीची जत्रा भरते. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी पाठीत आकडे टोचून घेतात व लाटेवर फिरतात. दुपारनंतर आकडे टोचण्याचा व लाट फिरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. सुमारे तीस फूट उंचीच्या खांबावर तेवढ्याच लांबीची लाट फिरवली जाते. ज्या भक्तांना नवस फेडायची आहे ते स्वतः किंवा देवीचे मानकरी यांच्यामार्फत नवस पूर्ण करतात. पाठीत आकडे टोचण्यासाठी, नवस पूर्ण करणाऱ्या भाविकास देवीच्या मंदिराच्या समोर उभे केले जाते. पाठीत टोकदार आकडे टोचले जातात. त्यानंतर टोचलेल्या आकड्यासह मंदिराच्या भोवती व लाटेच्या खांबा भोवती प्रदक्षिणा पूर्ण करून देवीचा आशीर्वाद घेऊन आकडे टोचलेल्या भाविक किंवा मानकऱ्यास लाटेखाली आणले जाते. एका बाजुला त्या भाविकाला आकड्यांवर दोरीच्या साह्याने घट्ट बांधले जाते आणि दुसऱ्या बाजूने लाट फिरविली जाते. लाटेवर स्वार भाविक देवीचा जयघोष करीत नवस फेडण्याची कृतज्ञता व्यक्त करीत हातातली घंटा वाजवीत इच्छेनुसार एक, दोन, तीन किंवा पाच फेऱ्या पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण करतात. नंतर खाली उतरल्यानंतर आकडे काढले जातात. आकडे टोचलेल्या ठिकाणी देवीचा अंगारा लावला जातो.
९ जणांनी आकडे टोचून घेतले
यावर्षी ९ जणांनी आकडे टोचून घेतले. सुरुवातीला देवीचा मानाचा आकडा उत्तम नरवणकर यांनी टोचून घेतला. त्यानंतर गुहागरचे हेरंब कानडे यांनी सेवा म्हणून आकडा टोचून घेतला. नरवणचे ग्रामोपाध्याय असलेल्या कानडे घराण्यात गेल्या 35 वर्षात कोणीच आकडा टोचला नव्हता. संस्कृत विषयाचे शिक्षक असलेले हेरंब कानडे यांनी ग्रामदैवत व्याघ्रांबरीची सेवा करण्यासाठी बगाडात भाग घेतला. नयन दहिवलकर व दिपक पाटेकर यांनी आपल्या नवसाची पूर्ती स्वत: आकडा टोचून केली. (Bagada festival of Shri Vyaghrambari Devi)
संतोष धामणस्कर यांच्या नवसपूर्तीसाठी अनिकेत पाटेकर, बाळकृष्ण कोळवणकर यांच्या नवसपूर्तीसाठी धनंजय जाधव, अनिकेत पवार यांच्या नवसपूर्तीसाठी प्रमोद नरवणकर, गुरुदास रोहिलकर यांच्या नवसपूर्तीसाठी संजोग मालप यांनी तर प्रशांत सुर्वे यांच्या नवसपूर्तीसाठी मदन नरवणकर यांनी आकडा टोचून घेतला. मदन नरवणकर गेली ३० वर्षे देवीचा आकडा टोचून घेत आहेत. यापूर्वी त्यांनी आकडा टोचून लाटेवर सर्वाधिक ३२ फेऱ्या मारल्या आहे. यावर्षी त्यांनी १२ फेऱ्या मारल्या.
नरवणचा बगाडा पहाण्यासाठी दरवर्षी गुहागर तालुकावासीय गर्दी करत असतात. यावर्षी तालुकावासीयांबरोबरच गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे येथील पर्यटकही मुद्दाम नरवणला ही आगळीवेगळी परंपरा पहाण्यासाठी आले होते. यापैकी बेळगावला वैद्यकीय व्यवसाय करणारे दांम्पत्य म्हणाले की, यामध्ये विज्ञान आहे परंतु विज्ञानाच्या पुढेही मन:सामर्थ्यांची ताकद कीती असू शकते याचे पराकोटीचे हे उदाहरण आहे.