गुहागर : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टी (पूणे) या संस्थेच्या समतादूत प्रकल्पा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सडे जांभारी गावामध्ये संविधान साक्षरता अभियान उपक्रम दि.२६ नोव्हेंबर २०२१ ते दि.२६ जानेवारी २०२२ या कालावधीत शैक्षणीक , सामाजीक ,अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसन मुक्ती, तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक सलोखा राखणारे समतेवर आधारीत संविधानाला पूरक असे विवीध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
Under the Samatadoot project of Barti (Pune), an autonomous body of the Department of Social Justice, Constitution Literacy Campaign in Sade Jambhari village in Guhagar taluka of Ratnagiri district from 26th November 2021 to 26th January 2022 in educational, social, eradication of superstition, de-addiction and health. It will be celebrated by implementing various activities which are complementary to the Constitution based on equality and maintaining thematic and social harmony.
संविधान साक्षर अभियानासाठी बार्टी संस्थेने सडेजांभारी गावाची निवड केली असून विवीध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ निर्मल ग्रामपंचायत सडे जांभारी येथे करण्यात आला. गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथे मान्यवरा़च्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि संविधान प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूदायीक वाचन करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थांनी सोशल डिस्टींगचे पालन करून संविधान प्रतिमेची दिंडी काढली नंतर बार्टी संस्थेच्या गुहागर तालुक्यातील समतादूत शितल संग्राम पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमॎाच्या शुभारंभी सडे जांभारीचे पोलीस पाटिल प्रभाकर सुर्वे, ग्रामसेविका अपूर्वा हुमणे, कृषी सहाय्यक विक्रम बाचकर, सडे जांभारी शाळा नं.१ चे मुख्याध्यापक अमोल होवाळे , अंगणवाडी सेविका रोहिणी सुर्वे, मदतनीस स्वप्नाली सुर्वे, अंगणवाडी सेविका रूंदा देवरूखकर, स्वाती सुर्वे, ग्रामपंचायत कर्मचारी रोहित सुर्वे, अनिल घेवडे, गुहागर तालुका समता दूत शितल संग्राम पाटील, सडे जांभारी परिसरातील आशा सेविका आदि मान्यवर उपस्थीत होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका अपूर्वा हुमणे यांनी केले तर मुख्याध्यापक अमोल होवाळे यांनी सर्वांचे आभार मानले.