पाटपन्हाळे ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय
गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी या गावाची पाहणी करुन तशाप्रकारचा गाव घडवण्याचा मानस तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने व्यक्त केला असून येथील शेतकरी हिवरेबाजारच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. तसा निर्णय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
By inspecting this village for the development of our village on the lines of Hivrebazar village in Nagar taluka of Ahmednagar district. The Patpanhale Gram Panchayat in Manas taluka has expressed its intention to build such a village and the farmers here will go on a study tour of Hivrebazar. Such a decision has been taken in the recent Gram Panchayat Gram Sabha.


या दौ-याचा खर्च १५ व्या वित्त आयोगातून करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. १९७२ च्या दुष्काळानंतर ज्वारी आणि बाजरी हीच गावातली मुख्य पिकं होती. ९५ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली होते. गावात पावसाचं प्रमाण २०० ते ४०० मि. होतं. गावातले लोक चार महिन्यांसाठी स्थलांतर करू लागले. हिवरेबाजारचा चेहरामोहरा बदलला तो या गावचे सरपंच पोपटराव पवार यांच्यामुळे त्यांनी जलसंधारणाचं नियोजन करून गावात पहिलं पाणी आणलं. समपातळीवर चर, कुरण विकास रोजगारही मिळाला. पाणीही मिळालं आणि गवत आल्यामुळे सगळं चित्र बदलले. हिवरेबाजारचा चेहरामोहरा बदलला. इथली कोरडवाहू शेती बागायती झाली आहे. पण मजुरांचा तुटवडा भासत आहे. बाहेरच्या गावातून इथे कसण्यासाठी लोक येतात. असा हिवरेबाजार पाहण्यासाठी पाटपन्हाळे गावचे शेतकरी अभ्यास दौरा करणार आहेत.

