विंटेज वाहनांचा स्वतंत्र विचार व्हावा : जयंत पाखोडे
गुहागर : 15 वर्षांवरील वाहने सरसकट स्क्रँप करण्याचे केंद्राचे धोरण चुकीचे आहे. आमच्यासारखे अनेक वाहनप्रेमी मुलांप्रमाणेच वाहनांचा सांभाळ करतात. देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करतात. अशा वाहनांचे अस्तित्व टिकवण्यासाठी केंद्राने स्वतंत्र धोरण तयार करावे. अशी वाहनचालकांची मागणी आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ वाहनचालक जयंत पाखोडे तथा जेपी यांनी केले.
The Centre’s policy of scrapping vehicles over 15 years of age is wrong. Many motorists like us take care of vehicles just like children. They spend millions of rupees for maintenance. The Center should formulate a separate policy for the survival of such vehicles. Such is the demand of motorists. This statement was made by senior drivers Jayant Pakhode and JP.


पत्रकारांजवळ बोलताना जेपी म्हणाले की, घरातील माणूस आजारी पडला तर त्याचे आरोग्य उत्तम होण्यासाठी ते कुटुंब लाखो रुपये खर्च करते. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी कर्ज उभे करून उपचार केले जातात. आमच्यासाठी या दुचाकी ही कुटुंबातील एक सदस्य आहेत. दुचाकी नादुरुस्त असेल, एखादा भाग मिळत नसेल तर आम्ही जगात शोध घेतो. ओरिजिनल भाग मिळू शकत नसेल तर नव्याने तयार करतो. आपली दुचाकी कायम चालती फिरती रहावी म्हणून लाखो रुपये खर्च करतो. परंतु आता केंद्राच्या धोरणामुळे आमच्या वाहनांची ओळख भंगार अशी बनली आहे. हे वेदनादायक आहे. केंद्र सरकारने अशा वाहनांसाठी स्वतंत्र धोरण करण्याची आवश्यकता आहे.


याविषयाबाबत जनजागृती व्हावी म्हणून जाणीव पुर्वक आम्ही देशातील विविध राज्यात ही वाहने घेऊन जातो. आजही हजारो किलोमीटर फिरण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. हे जनतेला दाखवून देतो. आज देशात केवळ दुचाकीच नाही तर जुन्या चारचाकी सांभाळणार्यांची संख्याही मोठी आहे. मुंबईतून हद्दपार झालेल्या टँक्सी म्हणजेच फियाट, मेटँडोर एफ 307, हिलमन, बग्गी अशा विंटेज कार सुस्थितीत सांभाळणारे अनेक आहेत. त्यामुळे सरकारने अशा विंटेज वाहनांसाठी स्वतंत्र धोरण आखावे. अशी आमची मागणी आहे.

