• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
17 0
0
गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर :  विविध राज्यातून आलेल्या 60 दुचाकी स्वारांचे पालशेत आणि गुहागर शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी जुन्या गाड्या पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान कोकण हेरिटेज राईडमधील दुचाकी पालशेत मध्ये पोचल्या. तेथील मारुती मंदिर येथे  श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना पालकर, अशोक चव्हाण,  अंकुश बोटके,  कैलास मांडवकर,  प्रल्हाद मांडवकर,  अजय बोटके,  देवळे मँडम,  प्रकाश मिरवणे यांनी सर्व दुचाकीस्वारांचे स्वागत केले. प्रवीण रणपिसे, जयंत पाखोडे, समीर सोनार आदी 15 जणांचा गुलाबपुष्प देवून सत्कार केला. यावेळी पालशेतमधील ग्रामस्थांना काही दुचाकी स्वारांनी जुन्या दुचाकींची माहिती दिली.
Coming from the state Of 60 two-wheelers bikers Welcome to Palshet and Guhagar. At this time people had crowded to see the old cars.Saturday between 11.30am The two-wheeler from Konkan Heritage Ride reached Palshet. Welcoming all the two-wheelers bikers at the Maruti Mandir there.

गुहागर रायडर क्लबच्या वतीने पुणे येथील हौशी  रायडर  प्रवीण रणपिसे, समीर सोनार, जयंत पाखोडे यांचे गुहागर मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी गुहागर रायडर क्लब चे सदस्य शामकांत खातू, मनिष मोरे, अमरदीप परचुरे, अमित मोरे, विरेश बागकर व शांताई रिसॉर्ट चे सिद्धेश खानविलकर उपस्थित होते.

आजच्या  या युगात १९ ६१- ७१ पासून ची ते १९९४ अशी जुन्या विंटेज बाईक पाहण्याची संधी आम्हां गुहागर वासीयांना मिळाली आम्ही भारावुन गेलो.
– शामकांत खातू

Tags: bikerscrowdeGuhagarGuhagar NewsKonkan Heritage RideMarathi NewsMaruti MandirNews in Guhagarold carstwo-wheelers bikersकोकण हेरिटेज राईडगुहागर रायडर क्लबटॉप न्युजताज्या बातम्यादुचाकी स्वारपर्यटकमराठी बातम्यामारुती मंदिरलोकल न्युजश्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.