• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
16 1
0
गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण मार्गावर बस सुरू

गुहागर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २५ रोजी सांगितले होते. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कर्मचारी सेवेत हजर होणार नाहीत, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. असे असताना शनिवारी गुहागर आगारातील विलीनीकरण मुद्द्यावर ठाम असलेल्या ३५४ कर्मचाऱ्यांपैकी ९ कर्मचारी सेवेत रुजू झाले. गुहागर आगारातून तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण बस सोडण्यात आली. शृंगारतळीत बस आल्यावर प्रवाशांनी गर्दी केली. ग्रामस्थांनी एसटी कर्मचारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले आणि गाडीला हार घालण्यात आला.
Employees will not be in service until the demand is met, This is what the holy staff has taken. Meanwhile, out of 354 employees who were adamant on the merger issue at Guhagar depot on Saturday, 9 employees joined the service.

मंगळवारी तीन चालक सेवेत हजर झाल्याने चिपळूण मार्गावर तीन फेऱ्या सोडण्यात आल्या. गुहागरला आजही अनेक कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून जो पर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा अनेक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबत बोलताना आगार प्रमुख वैभव कांबळे म्हणाले, आज परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यामध्ये ३ चालक, ३ पर्यवेक्षक, १ वाहतूक निरीक्षक, १ शिपाई, १ कार्यशाळा कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. उद्यापासून आणखी कर्मचारी वाढतील. आणखी कर्मचारी कामावर येण्यास इच्छुक आहेत. मंत्री महोदयांनी पगार वाढ चांगली दिली आहे. त्याचा आदर ठेऊन प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण यांना सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.

गेली २० दिवसात ५ हजार २०० फेऱ्या रद्द होऊन गुहागर आगाराचे  एक कोटी ६० लाखाचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसात गुहागर आगारातून बस सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास श्री. कांबळे यांनी व्यक्त केला.

Tags: adamantemployeesGuhagarGuhagar depotGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarservicestaffएसटी महामंडळगुहागर आगारटॉप न्युजताज्या बातम्यापरिवहन मंत्री अनिल परबमराठी बातम्याराज्य सरकारलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.