गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय सांविधान दिन उत्साहात संपन्न झाला.
The principal of Patpanhale College of Arts, Commerce and Science of Patpanhale Education Society at Sringartali in Guhagar taluka, Dr. Raosaheb Jadhav Under his guidance, the Indian Constitution Day was celebrated with enthusiasm by the Department of Culture and Political Science.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. प्रमोद देसाई यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटना यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव, प्रा. प्रसाद भागवत, डॉ. कृष्णाजी शिंधे, डॉ. प्रवीण सनये, डॉ. सुभाष खोत, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. त्रिशिला साबळे, ग्रंथपाल धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर पशुराम चव्हाण, वरीष्ठ लिपिक सुधीर टानकर, स्नेहल संसारे, कनिष्ठ लिपिक विश्वनाथ कदम, नंदकुमार भेकरे, संदिप चव्हाण, रविंद्र चव्हाण, महेश झगडे व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी भारतीय सांविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात मतदार जागृती उपक्रमांतर्गत राज्यशास्त्र व इतिहास विभागाच्यावतीने महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नविन मतदार म्हणून नाव नोदणी करुन घेण्यात आली. याच अनुषंगाने मतदार जागृती उपक्रमांतर्गत तहसिलदार प्रतिभा वराळे यांचे महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली. आजच्या काळातही आपले संविधान कसे कार्यरत आहे. आपणही संविधानामुळे कसे सुरक्षित आहोत. देशाच्या स्वातंत्र्याबाबत व संविधानाबाबत इतरांकडून केल्या जाणा-या चूकिच्या विधानांकडे दुर्लक्ष करुन देशातील प्रत्येक नागरीकाने व विद्यार्थ्याने आपल्या संविधानाच्या नियमांचे पालन केले पाहिजेत व त्याचे रक्षणही केले पाहिजे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव यांनी तर आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले.