• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

by Ganesh Dhanawade
December 14, 2021
in Ratnagiri
18 1
0
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या बॉस्को बेथेलो, जयवंत सुर्वे आणि तुषार अंबुरे अशा ०५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या निवड झाली आहे.

 कोकणातील दर्जेदार शिक्षणासाठी आणि उत्तमोत्तम विद्यार्थी तयार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने नेहमीच आपले मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी तसेच करियर घडविण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. यामध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नेहमीच पाठबळ लाभले आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याचे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, सदस्य डॉ. उमेश संकपाळ, मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. नितीन पोतदार व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्रा. रश्मी भावे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे नमूद त्यांनी नमूद केले. भविष्यात अशाचप्रकारचे सुयश महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राप्त करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsMicrobiology Sciences DepartmentNews in GuhagarPostgraduateStudentsटॉप न्युजताज्या बातम्याबायोलॉजीकल सायन्सेस विभागमराठी बातम्यामायक्रोबायोलॉजीरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीलोकल न्युजसिरम इन्स्टिट्यूट
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.