अपघात की घातपात याची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
गुहागर : जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमार बोटीला बरेच दिवस उलटून गेले असून यातील खलाशी आता जिवंत सापडण्याची आशा आता धूसर झाली आहे. हे सर्व खलाशी गुहागर तालुक्यातील गरीब कुटुंबातील असून त्यांच्या निराधार कुटुंबाला मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचा याबाबतचा कायदा मात्र वेगळा आहे, तरीही मी या बाबत सातत्याने शासनाच्या संपर्कात असून शासनाकडून व खासगी व्यावसायिकांकडून या कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
The sailors who went missing from Jaigad are from a poor family in Guhagar taluka and their destitute family is in dire need of help. “Unfortunately, the National Disaster Management Act is different. However, I am in constant touch with the government and I am committed to get help from the government and private businesses,” said MLA Bhaskar Jadhav.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गटातील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मच्छीमारी व्यवसायात असलेले हे गरीब खलाशी यांना कसलेही शासन संरक्षण नाही. एखादा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला की नियमाप्रमाणे त्याची वाट सात वर्षे पहावी लागते. व त्यानंतरच त्याला बेपत्ता वा मृत घोषित करता येते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला वा वारसांना शासकीय मदत घोषित करता येत नाही. आपल्याकडे एखादा इसम झाडावरून पडून मुत्य, सर्प दंश होऊन मृत्यू वा अपघात झाला तर त्याला तातडीने ४ लाख रुपये मदत मिळते. परंतु, मच्छीमारांच्या बाबतीत दुर्दैवाने असे घडत नाही. तरीही राज्याचे मुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या मी सातत्याने संपर्कात असून या खलाशांच्या कुटुंबांना मी निश्चितपणे मदत मिळवून देईन असे त्यांनी यावेळी सांगितले.
जयगड येथील नावेद २ ही बोट बेपत्ता होण्यामागे एखादी घातपाती संघटना असू शकते. त्या दृष्टीने तपास होण्याची आवश्यकता आहे. समुद्रात एखादी मच्छीमार बोट दुर्घटनाग्रस्त झाल्यास तत्काळ आजूबाजूच्या बोटींना संदेश जातो. अपघातग्रस्त बोटीचे अवशेष व बोटीवरील वस्तू सापडतात. तसे काहीही न झाल्याने याबाबत शंका बळवल्या आहेत. म्हणून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मी शासनाकडे मागणी केली आहे असे जाधव म्हणाले.
पाकिस्तानी मच्छीमारांनी केलेल्या गोळीबारात पालघर मधील एक मच्छीमार मारला गेला. तसा प्रकार इथे घडला नाही ना, येतील स्थानिक मच्छीमारांजवळ चौकशी केल्यानंतर मी गृहमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. व त्यांनी या चौकशीसाठी स्वतंत्र पथक नेमतो असे सांगितले आहे. कोणत्याही गोष्टीचा अंदाज वर्तवण्यापेक्षा सखोल चौकशी व्हावी हा अपघात की घातपात या दोन्ही गोष्टी शोधल्या जाव्यात अशी ही मागणी मी लावून धरलेली आहे. तसेच जिंदाल कंपनीच्या कार्गोने बोटीला धडक दिली असेल तर त्याचीही चौकशी होणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. स्थानिक मच्छीमारांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की, एखाद्या वेळेस बोटीला अपघात झाल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची तातडीची मदत मिळत नाही. त्यासाठी असे अपघात झाल्यास तात्काळ मच्छिमारांना तातडीची मदत मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आम. जाधव म्हणाले.