गुहागर : गुहागर आगारातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटने तर्फे गेले अनेक दिवसांपासून विवीध मागण्यांसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला गुहागर तालुका क्षत्रीय मराठा युवा संघाने पाठींबा दिला आहे.
On behalf of Maharashtra Parivahan Mahamandal Employees Union at Guhagar Depot For the last several days, a statewide strike has been called for various demands. This movement is supported by Guhagar Taluka Kshatriya Maratha Yuva Sangh.
आपल्या कामाचा अतिरिक्त ताण तसेच सण, ऊत्सवाच्यावेळी प्रामाणिकपणे दिवस-रात्र सेवा देणाऱ्या कर्मचा-यांना इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेतन खूपच अल्प प्रमाणात देण्यात येतो. तेहि वेळेत अथवा नियमीत होत नाही. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून आपल्या स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा दिली. अशा या कामबंद आंदोलन दडपण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडुन ३७६ कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई प्रामाणिक सेवेचा अपमान आहे. म्हणूनच क्षत्रीय मराठा युवा संघ गुहागर संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलनास पाठींबा दिला आहे.
या आंदोलनामुळे प्रवाशांची जरी गैरसोय हाेत असली तरी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपल्या कामबंद आंदोलनाला क्षत्रीय मराठा युवा संघटनेचा कायमच पाठींबा राहिल. या कामबंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुहागर आगारमध्ये जाऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी अॕड. संकेत साळवी, संदेश साळवी, निखील साळवी, सुहास विचारे, शुभम साळवी, प्रथमेश साळवी आदींसह अन्य उपस्थित होते.