गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्यावतीने आयोजित किल्ला बनवा स्पर्धा-२०२१ मध्ये फ्रेंड सर्कल ग्रुप दाभोळ (ता.दापोली जिल्हा रत्नागिरी)यांनी बनवलेली किल्ला जंजिरा प्रतिकृती प्रथम क्रमांक विजेतेपदाची मानकरी ठरली आहे.
The fort Janjira replica built by Friend Circle Group Dabhol (Tal. Dapoli, District Ratnagiri) has become the first place winner in the 2021 organized by Swarachaitanya Group Abloli in the taluka.
या स्पर्धेत साईराम डान्स ग्रुप पालशेत, कलाधिपती कलामंच असुर्डे, सुयश भारत बुवा-सांगली यांच्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली असून या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे परिक्षण स्वरचैतन्य ग्रुपच्या वतीने करण्यात आले. विजेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेतील सर्व सहभागी सदस्यांचे स्वरचैतन्य ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले.