• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

by Manoj Bavdhankar
December 10, 2021
in Guhagar, Old News
17 0
1
माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शांताई रिसॉर्ट मध्ये शाही थाटात पार पडला स्नेहमेळावा

गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे या विद्यालयातील सन १९९५ मधील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी दिनी अतिशय आनंदाच्या वातावरणात स्नेहमेळावा पार पाडला. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार, दिनांक ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी तालुक्यातील नामांकित शांताई रिसॉर्ट मध्ये शाही पद्धतीत आयोजित करण्यात आला.
New English School, Patpanhale In the year 1995 in this school The alumni of class X held a get-together in a very happy atmosphere. A reunion of all these alumni was held on Sunday, November 07, 2021 at the renowned Shantai Resort in the taluka in a royal manner.
सदर शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात यशस्वी झालेल्या आणि वेगळा ठसा उमटवलेल्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या मनोगतातून आठवणींचे अनेक पट उलगडले. यावेळी वर्ग मित्र- मैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. ‘अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती… ‘ या गाण्यातील ओळींना साजेल अशा वातावरणात हा स्नेहमेळावा विविध कार्यक्रमांनी पार पडला. यामध्ये दिपाली वझे व कीर्ती काटदरे यांनी आपल्या सुरेल आवाजातून गाणी गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
प्रत्येक वर्षी दिवाळीत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला. संघटनेच्या वाटचालीसाठी अनेकांनी आर्थिक देणगीही जाहीर केली. या स्नेहमेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांमधील विद्यार्थी व सध्या पोलीस दलात आयपीएस अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे मंदार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी उदय जाधव व स्मिता चौगुले यांनी केले. तसेच अनेक वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणारे समूह प्रमुख नंदकुमार गांगण व सर्फराज मालगुंडकर आणि कादंबरी वेल्हाळ यांचे सर्व विद्यार्थ्यांनी आभार मानले.

Tags: Alumni Dayatmosphereget-togetherGuhagarGuhagar NewsMarathi NewsNew English SchoolNews in Guhagarrenownedreunionroyal mannerShantai Resortआयपीएस अधिकारीटॉप न्युजताज्या बातम्यान्यू इंग्लिश स्कूलमराठी बातम्यालोकल न्युजशांताई रिसॉर्टस्नेहमेळावा
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.