• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar, Old News
16 0
0
पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल

गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात ‘गाज स्वरगंध’ दिवाळी पहाट मैफल पंडीत उपेंद्र भट यांच्या गायनाने उत्तरोत्तर रंगली. गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी रंगलेल्या या मैफलीला रसिकांनी दाद दिल्याने ही पहाट उजळून निघाल्याचे पहायला मिळाले.
Upendra Bhat’s singing of ‘Gaj Swargandh’ Diwali dawn concert was in full swing in the atmosphere of the vast beach, the cool breeze of Surubana, the humming of birds and the roar of the sea. The dawn dawned as the audience appreciated the colorful concert at Palshet beach in Guhagar taluka.

पालशेत गाज रिसॉर्टतर्फे ‘गाज स्वरगंध’ हा प्रथमच दिवाळी पहाटेचा कार्यक्रम रविवारी पहाटे पार पडला. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गाज रिसॉर्टचे जितेंद्र जोशी यांनी गुहागरवासीयांना दिलेल्या या अनोख्या दिवाळी भेटीचे सर्वांनी कौतुक केले. या मैफलीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचा वारसा चालवणारे श्री. पंडित उपेंद्र भट यांचे शास्त्रीय गायन झाले. शास्त्रीय गायकीवर आधारित ‘मोरे मन लागो नंदरवा’ ही तोडी रागातील बंदिश, गीत रामायणातील निवडक गीते, खास फर्माईश म्हणून ‘प्रथम तुज पाहता’  व ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी सदाबहार गीते व नाट्यगीते यांनी मैफल रंगली. सागर किनाऱ्यावर सजलेल्या या मैफिलीला भोवतलाच्या वातावरणाने ‘चार चाँद’ लागले.

Tags: atmosphereconcertCool windsDiwaliGaj SwargandhGuhagarGuhagar Newshumming of birdsMarathi NewsNews in GuhagarPalshet beachSurubanगाज रिसॉर्टगाज स्वरगंधटॉप न्युजताज्या बातम्यादिवाळी पहाटपालशेत समुद्रकिनारामराठी बातम्यामैफलीलोकल न्युजसमुद्रकिनारासुरुबन
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.