खलाशांसह बेपत्ता बोटीबाबत घेतली माहिती
गुहागर : समुद्रात मासेमारीसाठी गेलेली जयगड येथील बोट खलाशांसह बेपत्ता झाली. या बोटीवरील ७ पैकी ६ खलाशी हे गुहागर तालुक्यातील आहेत. यातील ३ खलाशी हे साखरीआगर गावातील आहेत आणि यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांना ज्या दिवशी बोट बेपत्ता झाल्याचे कळले तेव्हापासूनच त्यांनी कोस्टगार्ड, बंदर विभाग, स्थानिक पोलीस आदींशी संपर्क करून बोट आणि बोटीवरील खलाशांच्या शोधासाठी ही संपूर्ण यंत्रणा कार्यरत केली. परंतु, उर्वरित खलाशांचा अदयाप शोध लागू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज आमदार त्यांनी साखरीआगर येथे जावून तेथील मच्छीमारांशी संवाद साधला. ही घटना कशी घडली असावी, याची बारकाईने त्यांनी माहिती घेतली. वेगवेगळया बातम्या वाचनामध्ये येत आहेत, याबाबत तुमचा अंदाज काय, यापूर्वीदेखील अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत, त्या अनुभवावरून या दुर्घटनेबाबत तुम्हाला काय वाटते, असे वेगवेगळे प्रश्न विचारून आ. श्री. जाधव यांनी माहिती घेतली. बेपत्ता असलेल्या खलांशांच्या कुटुंबांचीही त्यांनी विचारपूस केली. त्यांना शासनाकडून आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी व अन्य मार्गाने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, एका बेपत्ता खलाशाच्या मुलाला कॅन्सर असल्याचे समजताच त्याच्याही उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळवून देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
He also questioned the families of the missing sailors. We will try to get them help from the government as well as the Chief Minister’s Assistance Fund and other means, we will get financial assistance for the treatment of the son of a missing sailor as soon as he finds out that he has cancer, he assured.


येथील मच्छीमार बांधवांशी बोलत असताना अशा दुर्घटना घडून किंवा मासेमारीसाठी समुद्रात गेले असताना आजारी पडून मच्छीमारांचा मृत्यू होतो. अशा मच्छीमारांच्या कुटुंबामध्ये कमविणारा कोणीही नसेल किंवा त्यांची मुले लहान असतील तर अशा कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहतो, अशी व्यथा काहींनी मांडली आणि त्याची उदाहरणे देखील दिली. त्यावर आमदार श्री. जाधव यांनी तात्काळ गुहागरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे यांच्याशी संपर्क साधला आणि गावामध्ये आपल्या कार्यालयातील टीम पाठवून सर्व्हे करण्याची व पेन्शनसारख्या वेगवेगळया शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची सूचना केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, सतीश मोरे, साखरीआगरचे माजी सरपंच विठोबा फणसकर, उपसरपंच सुदाम आंबेरकर, लक्ष्मण पावसकर, पांडुरंग पावसकर, रवींद्र नाटेकर, आत्माराम वासावे आदी उपस्थित होते.

