श्रीकांत कर्जावकर यांचे प्रतिपादन
गुहागर : एमसीएल कंपनीच्या माध्यमातून १० हजार लोकांचे संघटन करुन यामध्ये युवक – युवती, शेतकरी बंधू – भगीनी यांना संघटित करून पुढील वर्षी २६ जाने. रोजी प्रजासत्ताक दिनी जागतिक स्थरावरील जैविक इंधन, सेंद्रीय खत प्रकल्पाचा शुभारंभ करणार असून काेकणातील हा पहिलाच प्रकल्प असेल, असे प्रतिपादन एमसीएल कंपनीचे प्राईम बीडीए आणि श्रमसाफल्य अॉरगॕनिक प्रोड्यूसर कंपनीचे संचालक श्रीकांत कर्जावकर यांनी केले.
By organizing 10,000 people through MCL company, by organizing young men and women, farmer brothers and sisters, on 26th January next year. It will be the first of its kind in the world to launch a world-class biofuels and organic fertilizer project on Republic Day, said Shrikant Karjavkar, Director, MCL’s Prime BDA and Shramsafalya Organic Producers.
एमसीएल कंपनी सलग्न श्रमसाफल्य अॉरगॕनिक प्रोड्यूसर कंपनी लिमीटेड गुहागर या शेतकरी संस्थेचा दिवाळी स्नेहबंधन मेळावा तालुक्यातील साखरी आगर येथील कुणबी समाज सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी एमसीएलचे प्राईम बीडीए आणि श्रमसाफल्य कंपनीचे संचालक श्रीकांत कर्जावकर यांच्या हस्ते केंद्र चालक, बीडीए, सब बीडीए यांच्यासह उपस्थित शेतकरी बंधू-भगीनींना दिवाळी भेट देण्यात आली.
यावेळी बोलताना श्री. कर्जावकर म्हणाले, आपण सर्वजण काही माेजक्याच दिवसात १० हजार शेतकरी सभासद संख्या पूर्ण करणार आहोत. आपण एका विचाराचे, एका मताचे लोक एकत्र येऊन सर्वांनी एमसीएलच्या माध्यमातून हा प्रकल्प पूढे नेऊया यासाठी शेतकरी आजीवन संघटित असला पाहिजे. आपल्या परिसराचा अभ्यास करुन हि संकल्पना शेतक-यांपर्यंत पोहचवा. केंद्र चालकाची हि जबाबदारी आहे. शेवाळ शेती, सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, हत्ती गवत, मस्त्य उद्योग आणि पशुपालन व्यवसायातून योग्य नफा देऊन गावात रोजगार निर्मीती करुन ख-या अर्थाने दिवाळी साजरी करूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी एमसीएलचे सिनीयर बीडीए दिनेश कासेकर, जनसंपर्क अधिकारी संजय भागवत, श्रमसाफल्य कंपनीच्या संचालिका रश्मी मेस्त्री, कंपनीच्या प्रशासन सहाय्यक चैताली सोनावणे, कंपनीचे प्रशासन व्यवस्थापक सचिन मोहिते , गुहागर तालुका प्रतिनीधी संतोष घुमे आदी उपस्थित होते.