• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ विजयगड स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

by Ganesh Dhanawade
November 5, 2021
in Old News
16 0
0
तवसाळ विजयगड स्वच्छता मोहिमेला प्रारंभ
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सह्याद्री प्रतिष्ठान आणि तवसाळ ग्रामस्थांचे योगदान

गुहागर : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत गुहागर विभागाच्यावतीने आणि तवसाळ ग्रामस्थांच्या सहभागाने तवसाळ येथील विजयगडाच्या संवर्धन मोहिमेला प्रारंभ केला आहे. या मोहिमेचा प्रारंभीचा भाग म्हणुन सह्याद्री प्रतिष्ठान आणि तवसाळ ग्रामस्थांच्यावतीने किल्ल्याच्या प्रथम दर्शनी भागाची, प्राचीन वाड्यांच्या चौथ-यांची साफसफाई, जंगलतोड, गवत काढणी करण्यात आली. यामुळे गवताने वेढलेल्या विजयगडाने मोकळा श्वास घेतला आहे. 
Under the Sahyadri Pratishthan Hindustan, District Ratnagiri, on behalf of Guhagar Division and with the participation of Tavsal villagers, the conservation campaign of Vijaygad at Tavsal has been started. As an initial part of this campaign, the first sight of the fort, the quarters of the ancient forts were cleared, deforestation and grass cutting were done. As a result, Vijaygad, surrounded by grass, has breathed a sigh of relief.

सह्याद्री प्रतिष्ठान यांची दुर्ग शोध आणि संवर्धन मोहीम यामाध्यमातून छत्रपतींच्या इतिहासाची आधुनिक युगाला ओळख व्हावी यासाठीची चळवळ आणि विजयगडाचे संवर्धन झाल्यास व साफसफाई झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक संख्येमध्ये वाढ होईल. गावाच्या वैभवात भर पडेल आणि पर्यटनाच्या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होईल. हा ग्रामस्थांचा ध्यास या दोन्हींच्या माध्यमातून विजयगड दुर्ग संवर्धन आणि साफसफाई मोहिमेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान गुहागर विभागातील दुर्ग सेवक नयन चांदोरकर, मनीष कदम, वैभव घुमे, निलेश चांदोरकर, जोत्स्ना चांदोरकर, प्रसाद जांगळी, शैलेश भुवड, विराज भुवड, शैलेश किजबिले, अनिकेत कदम, समीर गुळेकर, आकाश मंचेकर, जय खाडे, कौस्तुभ बारगोडे आदी सहभागी झाले होते. तर तवसाळ ग्रामस्थांच्यावतीने प्रीतम सुर्वे, रत्नदीप गडदे, महेश शंकर सुर्वे, प्रणय सुर्वे, प्रसन्ना गवंडे, जयेश गडदे, शरद सुर्वे, महेश बळीराम सुर्वे, सागर जाधव हे सहभागी झाले होते. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता  मोहीम राबिवल्याबद्दल सह्याद्री प्रतिष्ठान विभाग गुहागर तालुका आणि तवसाळ ग्रामस्थ यांचे शिवप्रेमींमधुन विशेष कौतुक होत आहे.

Tags: conservation campaignfortsGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarSahyadri PratishthanTavasal villagersVijaygadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजविजयगडसह्याद्री प्रतिष्ठानसह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानस्वच्छता मोहिम
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.