• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

by Ganesh Dhanawade
November 4, 2021
in Old News
16 0
0
खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील पंचायत समिती खोडदे गणात विविध विकास कामांची भुमीपुजने करण्यात आली तसेच गणातील शिवसैनिकांचा मेळावा पाचेरी सडा येथे बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला.
Bhaskar Jadhav, MLA of Guhagar Assembly constituency performed Land worship of various development works in Panchayat Samiti Khodde Gana of Guhagar taluka and a gathering of Shiv Sainiks of the Gana was held at Pacheri Sada in the presence of majority of Shiv Sainiks.

खोडदे गणातील खोडदे मोहीते वाडी रस्ता, गोणबरे वाडी रस्ता, खोडदे नवलाई मंदिर ब्रिज, शरद साळवी घराजवळील रस्ता, मासू चाचे स्टाॅप रस्ता, आवरे फाटा भातगांव रस्ता, शिवणे दह्यांबे वाडी रस्ता, शिवणे पाण्याची वाडी रस्ता, भातगांव तिसंग वेलेवाडी संरंक्षण भिंत, कोसबी वेलेवाडी गणेश मंदिर येथे भातगांव मुख्य रस्ता, भातगांव सुवरे वाडी रस्ता, भातगांव वडाची वाडी रस्ता, भातगांव गोळेवाडी रस्ता, भातगांव ग्रामपंचायत ईमारत, कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका लोकार्पण, कोळवली बंदर वाडी रस्ता, कोळवली भुवड व हुमणे वाडी रस्ता,आंबवणे वाडी रस्ता अशी एकूण १९ विकासकामांची भूमीपूजने करण्यात आली.
आ.भास्कर जाधवांनी एक दिवसाच्या दौऱ्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्याने खोडदे गणातील शिवसैनिकांत चैतन्य पसरले आहे. यावेळी आ. भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर,पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, गटविकास अधिकारी अमोल भोसले आणि तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, माजी सभापती दत्ताराम निकम, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप सुर्वे, सचिन जाधव, विभाग प्रमुख नरेश निमुणकर, पुजा कारेकर, शरद साळवी, तालुका युवा अधिकारी अमरदीप परचुरे, विलास गुरव, शुभम बाईत, संदीप निमुणकर यांच्यासह खोडदे गणातील शिवसेना पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, शिवसैनिक उपस्थित होते. रविंद्र आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: developmentGuhagarGuhagar Assembly constituencyGuhagar Newsland worshipMarathi NewsMLA Bhaskar JadhavNews in GuhagarPanchayat Samiti Khodde GanShiv Sainikआमदार भास्कर जाधवगुहागर विधानसभा मतदार संघटॉप न्युजताज्या बातम्यापंचायत समितीभूमिपूजनमराठी बातम्यालोकल न्युजविकासकामशिवसैनिक
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.