गुहागर : कादवा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार २०१९-२० ने नुकतेच गौरविण्यात आले. हा समारंभ परशुराम साई खेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
On behalf of Kadava Pratishthan, Nashik, the novel “Pipilika Muktidham” was recently honored with Sahityaratna Annabhau Sathe Outstanding Vadmay Award 2019-20. The ceremony was held with great enthusiasm at Parashuram Saikhedkar Natyagriha, Nehru Garden, Nashik.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाशिक जिल्हाध्यक्ष तथा कादवा सहकारी साखर कारखाना, नाशिकचे अध्यक्ष श्रीराम शेटे, चित्रपट गीतकार श्री बाबासाहेब सौदागर, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर, प्रा.डॉ. यशवंतराव पाटील यांची आदी उपस्थिती होते. कादवा प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार प्रदान करताना पुरस्कार प्राप्त कवी, लेखक व साहित्यिकांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन करून तदनंतर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते डॉ. लबडे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत पिपिलिका मुक्तिधाम या कादंबरीस राज्यस्तरिय मानाचे सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कादवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार मिठे, सरचिटणीस श्री. विठ्ठलतात्या संधान, तुषार, मनोज व प्रतीक मिठे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यानी हा सोहळा यशस्वी केला.