• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

by Ganesh Dhanawade
November 2, 2021
in Old News
19 0
0
आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली (ता. गुहागर) या प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून कलाशिक्षक स्वरूपकुमार केळस्कर यांच्या पुढाकाराने आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी ९० विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून साकार झालेल्या आकाश कंदिलाचे प्रदर्शन प्रशालेच्या आवारात करण्यात आले होते.
On the initiative of art teacher Swaroop Kumar Kelaskar, a competition was held to make sky lanterns at Chandrakant Bait Vidyalaya Abloli, run by Lokshikshan Mandal Abloli. In this competition, the sky lanterns created by the ingenious intelligence of the students were displayed in the school premises.

यामध्ये इकोफ्रेंडली आकाशकंदील, टाकाऊ पासून टिकाऊ आकाश कंदील, कोरोना संदेश नियमावली दाखविणारे आकाश कंदील, मायक्रम धाग्यापासूनचे आकाश कंदील, विविध कागदांच्या पासून विविध माध्यम विविध आकारात साकार झालेले आकाश कंदील विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीतून साकार झाले होते. ह्या उपक्रमाचे स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या तिन्ही संकल्पनेतून आयोजन केले होते. स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या हेतूने हा उपक्रम जरी राबवण्यात आला असला तरी सुद्धा प्रत्येक इयत्तेतून इ.५ वी ते १o वी मधील एक याप्रमाणे सहा प्रथम क्रमांक काढण्यात आले व गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कु. याज्ञवल्क्य फंड ( ५वी ), कु. सोनम लवटे ( ६वी ), कु.श्रेया भुते ( ७ वी ), कु.आर्यन पागडे (८वी ), कु. श्रावणी जाधव ( ९वी ), कु. मयुरी रसाळ ( १०वी ) या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.
आकाश कंदील प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक डी.डी. गिरी यांनी केले. यावेळी पालक -शिक्षक संघ उपाध्यक्ष आशिष भोसले, माजी सरपंच प्रमोद गोणबरे, केंद्रप्रमुख रवींद्र कुळे, अनंत पवार, नारायण सुर्वे यांसह शिक्षक-पालक तसेच कला क्षेत्रात काम करणारे संदेश पांचाळ, प्रतीक्षा पांचाळ हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थांचे कौतुक केले. प्रशालेतील कलाशिक्षक स्वरुपकुमार केळस्कर यांनी सूत्रसंचालन तर वैभव ढवळ  यांनी आभार मानले.

Tags: Chandrakant Bait Vidyalaya AbloliCompetitionDiwaliGuhagarGuhagar NewsingeniousintelligenceLokshikshan Mandal AbloliMarathi NewsNews in Guhagaroccasion of Diwalisky lanternsआकाशकंदीलइकोफ्रेंडली आकाशकंदीलकोरोना संदेश नियमावली दाखविणारे आकाश कंदीलचंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीटाकाऊ पासून टिकाऊ आकाश कंदीलटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामायक्रम धाग्यापासूनचे आकाश कंदीललोकल न्युजलोकशिक्षण मंडळ आबलोली
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.